- Advertisement -

एका सिरीज मधून आयडिया मिळाली,आणि आफताबने श्रद्धाच्या बॉडीचे केले 35 तुकडे!

0 1

श्रद्धा वॉकरच्या देहाचे 35 तुकडे करण्याची ‘आयडिया’ आफताबने या सिरीज मधून घेतलीय ..


कालपासून सोशल मिडीयावर एकाच गोष्टीची जास्त चर्चा रंगतेय ती म्हणजे “श्रद्धा वॉकर हत्याकांड”. 28 वर्षीय प्रेयसी श्रद्धा विकास वॉकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली, आणि हे प्रकरण लोकांसमोर आले . विश्वासघाताच्या या भयावह कथेत आरोपी, हा स्वतः मुलीचा प्रेमी निघाला.  ज्याने राहत्या घरात  श्रद्धाचा मृतदेह 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवला होता. नंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात तिच्या मृतदेहाचे तुकडे फेकून पुन्हा तो नॉर्मल आयुष्य जगायला लागला होता.

अटकेनंतर आफताबने गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांना सांगितले की, लग्नावरून झालेल्या भांडणानंतर त्याने श्रद्धा वॉकरची हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे करण्याची कल्पना “डेक्स्टर” या अमेरिकन गुन्हेगारी टीव्ही मालिकेतून प्रेरित होती.

महाराष्ट्रातील वसई येथील रहिवासी असलेली पीडित तरुणी आफताब पूनावाला याच्याशी रिलेशनशिपमध्ये होती आणि 2019 पासून त्याच कॉल सेंटरमध्ये काम करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे कुटुंबीय त्यांच्या नात्याला विरोध करत होते आणि त्यामुळे हे जोडपे नायगाव येथे राहू लागले आणि नंतर दिल्लीला गेले.

श्रद्धा वॉकर

नक्की काय आहे ‘डेक्स्टर’ सिरीजची कहाणी?

सिरीजची  कथा ‘डेक्स्टर’ नावाच्या मुलाभोवती फिरते, जो वयाच्या 3 व्या वर्षी अनाथ होतो. मग त्याला मियानी पोलीस अधिकारी हॅरी मॉर्गन हा दत्तक घेतो लहानपणी ‘डेक्स्टर’ने आपल्या आईची करवतीने केलेली निर्घृण हत्या पाहिली, जी त्याच्या मनात कोरलेली होती. हॅरी ‘डेक्स्टर’च्या मनातील आघात ओळखतो आणि नंतर त्याला शिक्षेपासून वाचण्यासाठी कायदेशीर त्रुटींचा फायदा घेणाऱ्या गुन्हेगारांची हत्या करण्यात मदत करतो. जगण्यासाठी, ‘डेक्स्टर’ मियामी पोलिस मेट्रो स्टेशनमध्ये फॉरेन्सिक तज्ञ म्हणून नोकरी सुरू करतो.

गुन्हेगारांना मारण्यापूर्वी ‘डेक्स्टर’ अत्यंत काळजी घेत असे. हातात हातमोजे घालून तो खून करतो आणि ज्या खोलीत तो घटना घडवून आणतो त्या खोलीला प्लास्टिकने पूर्णपणे झाकून टाकतो. मृतदेहांचे तुकडे केल्यानंतर, तो त्यांना अटलांटिक महासागराच्या खाडी प्रवाहात फेकतो. अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात माहीर असललेल्या ‘डेक्स्टर’ ची ही कहाणी  खूप लोकांनी पहिली आहे..

ही वेब सिरीज कुठे बघता येईल?

‘डेक्स्टर’ या क्राइम-ड्रामा वेब सिरीजचे आतापर्यंत 8 सीझन आले आहेत. त्याचा पहिला सीझन 2006 मध्ये रिलीज झाला होता आणि शेवटचा म्हणजेच आठवा सीझन 2013 मध्ये आला होता. तुम्ही ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर पाहू शकता.

श्रद्धा वॉकर

आता येऊया आफताब अमीन पूनावालावर..

नक्की कोण आहे आफताब अमीन पूनावाला?

आफताब अमीन पूनावाला हे त्याचे आई-वडील आणि लहान भावासह युनिक पार्क, दिवाणमान, वसई पश्चिम येथील रहिवासी आहेत. त्याची आई गृहिणी आहे आणि वडील बुटांचे घाऊक पुरवठादार आहेत.

वसईतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. पूनावाला यांनी मुंबईच्या एलएस रहेजा कॉलेजमधून बीएमएस पदवी मिळवली. अहवालानुसार, तो सांताक्रूझ कॉलेजमधून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज देखील करत आहे परंतु त्याने ते अर्धवट सोडले.
पूनावाला हा व्यवसायाने फूड ब्लॉगर आहे , तो इंस्टाग्रामवर ‘हंग्रीचोक्रो’ नावाने फूड ब्लॉग चालवायचा..

दिल्लीला जाण्यापूर्वी आफताब आणि श्रद्धा वसई पश्चिम येथील संस्कृत कॉम्प्लेक्समधील रिगल अपार्टमेंटमध्ये राहत होते.
आरोपी आफताब अमीन पूनावाला (28) हाही शेजारीच राहत होता. मुंबईत काम करत असताना दोघे प्रेमात पडले. श्रद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे नाते स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा हे जोडपे दिल्लीला गेले आणि मेहरौलीच्या छतरपूर भागात भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहू लागले. त्याच्यावर जीव लावणाऱ्या श्रद्धाचा तोच जीव घेईल, याचा विचारहीतिने केला नसेल.. पण आफताबने सांगितलेले तिच्या हत्येमागची कारणे सुद्धा आफताबची क्रूरता सिद्ध करतात..

श्रद्धा वॉकर

श्रद्धा वॉकरच्या हत्येमागचे कारणे..

  • 18 मे रोजी लग्नावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला, त्यानंतर आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि एक रेफ्रिजरेटर विकत घेऊन त्यात ठेवले.

 

  • नंतर त्यांनी 18 दिवसांच्या कालावधीत त्यांना शहरभर विखुरले. तो रोज रात्री २ वाजताच्या सुमारास छतरपूरच्या जंगल परिसरात शरीराचे अवयव टाकण्यासाठी बाहेर पडत असे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.