क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत इमानदार खेळाडू म्हणून आजही अॅडम गिलख्रिस्ट कडे पाहिलं जात..

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत इमानदार खेळाडू म्हणून आजही अॅडम गिलख्रिस्ट कडे पाहिलं जात..

अॅडम गिलख्रिस्ट: क्रिकेटच्या जगात नेहमीच विक्रमांची मालिका बनते किंवा मोडते, पण या सगळ्यात काही विक्रम असे बनतात जे संपूर्ण करिअरमध्येही मोडणे सोपे नसते. या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच एका लेखाबद्दल सांगणार आहोत. क्रिकेटमध्ये अंपायरने चुकीचे निर्णय देणे, अंपायरने आऊट दिल्यानंतरही बॅट्समनने विरोध करणे अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. याशिवाय, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, अंपायरने त्यांना आऊट देण्यापूर्वी किंवा नॉट आऊट दिल्यानंतरही फलंदाज स्वत:ला बाद समजतात आणि पॅव्हेलियनच्या दिशेने जातात.

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत इमानदार खेळाडू म्हणून आजही अॅडम गिलख्रिस्ट कडे पाहिलं जात..

जागतिक क्रिकेटच्या इतिहासात असेच काही खेळाडू होऊन गेले ज्यांच्या इमानदारीमुळे आजही प्रेक्षकांच्या नजरेत त्यांचे विशेष असे स्थान आहे. आजच्या या खास लेखामध्ये आम्ही तुम्हाला अश्याच दोन खेळाडू बद्दल माहिती देणार आहोत ज्यांना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत इमानदार खेळाडू म्हणून ओळखले जाते. महत्वाचे म्हणजे यांपैकी एक खेळाडू हा भारतीय आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.

अॅडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist)

तस  पाहिलं तर भारतातील सचिन, धोनीसह जगभरातील अनेक खेळाडूंनी स्वतःला बाद देण्याचे काम अनेकदा केले आहे. पण एक खेळाडू असा आहे ज्याने हा पराक्रम एक-दोनदा नाही तर तब्बल 12 वेळा केला आहे. असा खेळाडू कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ज्या व्यक्तीने हे केले तो ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आहे.

ऑस्ट्रेलिया नेहमीच चुकीच्या खेळासाठी ओळखला जातो आणि खेळादरम्यान, त्यांच्या कर्णधारासह अनेक खेळाडू मैदानावर अनेकदा चुकीचे खेळ करताना दिसले आहेत. पण या सगळ्यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर आणि जगातील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट हा असा फलंदाज होता, जो बाद झाल्यावर आपोआप पॅव्हेलियनच्या दिशेने जायचा.

12 वेळा गिलख्रिस्टने स्वतःला बाद दिले होते.

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत इमानदार खेळाडू म्हणून आजही अॅडम गिलख्रिस्ट कडे पाहिलं जात..

त्याच्या कारकिर्दीत अनेक वेळा असे घडले जेव्हा अंपायरला त्याच्या बॅटला बॉल लागला की नाही हे समजू शकले नाही आणि असे बरेच वेळा आले जेव्हा अंपायरने त्याला नाबाद घोषित केले, परंतु गिलख्रिस्ट आपोआप पॅव्हेलियनच्या दिशेने गेला. कारण तो बादर आहे हे त्याला माहीत होते. नंतर रिप्ले पाहिल्यावर पंचांनी चुकीचा निर्णय दिला आणि गिलख्रिस्ट बाद झाल्याचे सर्वांना समजले.

ऑस्ट्रेलियाचा हा धोकादायक यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टच्या कारकिर्दीत एकूण 12 वेळा अशी घटना घडली आहे. याचा अर्थ, तो स्वत: त्याच्या कारकिर्दीत 12 वेळा स्वतःला बाद दिले होते. हा एक अतिशय अनोखा आणि मोठा विक्रम आहे. अॅडम गिलख्रिस्ट हा खेळाडू किती प्रामाणिक होता हे या विक्रमावरून दिसून येते.


हेही वाचा:

IPL 2024 Auction: स्मिथ किंवा पॅट कमिन्स नाही तर लिलावात ‘या’ खेळाडूवर लागू शकते आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी बोली, आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरणे निच्छित..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *