…तरच पाकिस्तान विश्वचषक 2023 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो, पाकिस्तानसमोर आहे हा एकमेव मार्ग..

...तरच पाकिस्तान विश्वचषक 2023 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो, पाकिस्तानसमोर आहे हा एकमेव मार्ग..

 

  काल (9 नोव्हेंबर ) रोजी विश्वचषक 2023 मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड (SL vs NZ) यांच्यात सामना खेळवला गेला जो न्यूझीलंडने जिंकला. आयसीसी विश्वचषक २०२३ च्या आणखी एका महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपला मार्ग अतिशय सोपा केला आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये  खेळण्याच्या सर्व आशा जवळपास संपल्यात जमा झाल्या आहेत.. पाकिस्तानसाठी उपांत्य फेरी गाठण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रीलंकेने न्यूझीलंडला पराभूत करणे हा होता, पण पाकिस्तानच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

विश्वचषक इतिहासात या 4 गोलंदाजांची झालीय सर्वात जास्त धुलाई, एकाने तर दिल्यात तब्बल एवढ्या धावा..

भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी आधीचउपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे, तर न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान अंतिम संघासाठी स्पर्धा करत आहेत. मात्र, न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या दणदणीत विजयानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठणे अशक्य वाटत असतानाच किवी संघाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे..

…तरच पाकिस्तान करू शकतो सेमीफायनलमध्ये प्रवेश.

उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला शेवटचा सामना जिंकणे आवश्यक होते, मात्र आता कमी धावगतीमुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शेवटचा गट सामना जिंकल्यानंतर न्यूझीलंड 10 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान अनुक्रमे 8 आणि 8 गुणांसह पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. अफगाणिस्तानचा सामना शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेशी होणार असून पाकिस्तानचा सामना शनिवारी इंग्लंडशी होणार आहे.

...तरच पाकिस्तान विश्वचषक 2023 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो, पाकिस्तानसमोर आहे हा एकमेव मार्ग..

पाकिस्तान उपांत्य फेरीत कसा पोहोचेल?

आता प्रश्न असा पडतो की, पाकिस्तान उपांत्य फेरीत कसा पोहोचेल, तर पाकिस्तानला इंग्लंडला 287 धावांनी पराभूत करावे लागेल आणि जर इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली आणि पाकिस्तानने 50 धावांवर रोखून 2.5 षटकात लक्ष्य पूर्ण करावे लागेल जे अशक्य वाटते. त्यामुळे जवळपास पाकिस्तानच्या आशा संपल्यात जमा आहेत.

त्याचबरोबर उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४३८ धावांनी विजय मिळवावा लागेल, जो अशक्य वाटतो. म्हणूनच सेमिफायनल खेळणारा न्युझीलंड चौथा संघ ठरेल, हे जवळपास निच्छित झाले आहे.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *