प्रत्येक व्यक्तीचे कोणते ना कोणते तरी स्वप्न असतेच प्रत्येकाची लहानपणीची स्वप्न ही वेगळी असतात परंतु असे थोडेच लोक आहेत ज्यांची स्वप्न साध्य होत असतात. या जगात अशी कमी व्यक्ती आहेत ज्यांनी बघितलेली स्वप्न पूर्ण होतात. जर का बघितलेली स्वप्न पूर्ण नाही झाली तर माणूस हा नाराज होत असतो.

तर मित्रांनो बघितलेले स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून शेती मध्ये कष्ट करून आपले जीवन समृध्द बनवले आहे जाणून घ्या सविस्तर कहाणी.
उत्तर प्रदेश राज्यातील बागपत जिल्ह्यातील दिकाना या गावचा युवा तरुण मनोज आर्य. मनोज आर्य चे लहानपणी पासूनच चे स्वप्न होते की कलेक्टर व्हावे आणि आपल्या जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास करावा. त्यामुळे कलेक्टर होण्यासाठी UPSC ची तयारी करण्यासाठी दिल्ली येथे गेला. कित्येक वेळा UPSC मद्ये नापास झाल्यावर मनोज ने कलेक्टर होण्याचे भूत डोक्यातून काढून टाकले.
तसेच पॉलिटिक्स ची आवड असल्यामुळे मनोज ने 2006 साली अरविंद केजरीवाल सोबत सुद्धा काम केले. तसेच अरविंद केजरीवाल सोबत राहून त्यांनी अनेक आंदोलने केली. तसेच त्यांना RTI चे मेंबर पद सुद्धा दिले होते. परंतु काही करणवस्थ 2016 मध्ये पॉलिटिक्स मधून मनोज आर्य बाहेर पडले.
त्यानंतर मनोज आर्य यांना शेतीविषयी आवड निर्माण झाली. शेतीचे संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे त्यांनी इंटरनेट चा वापर मोठ्या प्रमाणात केला आणि शेती संधबधीत माहिती गोळा करू लागले. मनोज ने सुरुवातीस आपल्या शेतामध्ये उसाची लागवड केली.
परंतु मनोज ने ऊसापासून गुळ तयार करून विक्री करण्यास सुरुवात केली. अश्या प्रकारे ऑरगॅनिक गुळ विक्री करून मनोज आर्य 6 लाख रुपये कमवतात. बाजारात ऑरगॅनिक गुळाला चांगला भाव सुद्धा मिळत आहे. तसेच या गुळाला विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
पुढे पुढे नवीन गोष्टी शिकत शिकत मनोज आर्य ने मोठ्या प्रमाणात प्रगती साधली आणि आपले जीवन समृध्द बनवले. तसेच ते बोलले की शेतीमधून सुद्धा माणूस आथिर्क साक्षर होऊ शकतो फक्त कष्ट करण्याची तयारी असावी.