आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने (आयसीसीने) मंगळवारी (२४ जानेवारी ) मेन्स ODI टीम ऑफ द ईयर २०२२ ची घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद बाबर आझमकडे (Babar Azam) देण्यात आले आहे. तर केवळ २ भारतीय खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाकडून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि मोहम्मद सिराज (Mohammad siraj) या दोन खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. वनडे क्रिकेटमध्ये बाबर आजमने जोरदार कामगिरी केली आहे. त्याने ९ सामन्यांमध्ये ८४.८७ च्या सरासरीने एकूण ६७९ धावा केल्या आहेत.
कर्णधार म्हणून देखील बाबर आजमने चांगली कामगिरी केली आहे. त्याने २०२२ मध्ये कर्णधार म्हणून ९ वनडे सामने खेळले. यादरम्यान त्याने केवळ १ सामना गमावला होता. ही कामगिरी पाहता त्याला वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
तसेच भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, श्रेयस अय्यरने २०२२ मध्ये जोरदार कामगिरी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १७ सामन्यांमध्ये ५५.६९ च्या सरासरीने ७२४ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ अर्धशतके आणि १ शतक झळकावले.
तसेच जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने देखील अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्याने नव्या आणि जुन्या चेंडूने चांगल्या लाईन आणि लेंथने गोलंदाजी केली आहे. २०२२ मध्ये खेळलेल्या १५ वनडे सामन्यांमध्ये त्याने एकूण २४ गडी बाद केले आहेत.
अशी आहे आयसीसी ODI टीम ऑफ द ईयर २०
बाबर आझम (कर्णधार), ट्रेविस हेड,शे होप, श्रेयस अय्यर, टॉम लेथम( यष्टिरक्षक), सिकंदर रजा, मेहदी हसन मिराज,अल्जारी जोसेफ, मोहम्मद सिराज, ट्रेंट बोल्ट, ऍडम झांपा.