ICC Champion Trophy 2025: पाकिस्तान पुढील वर्षी 2025 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदासाठी स्टेडियम्सचे अपग्रेडेशन केले जात आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी देशातील स्टेडियममध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी स्टेडियमच्या दुरवस्थेबद्दल सांगितले की,
Future design of Pindi Cricket stadium for ICC Champions Trophy 2025 pic.twitter.com/SNKHMV7Bzg
— Abdul Ghaffar 🇵🇰 (@GhaffarDawnNews) August 14, 2024
‘आमचे स्टेडियम आणि आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये फरक आहे. आमचे कोणतेही स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जवळ नाही. आमच्या जागा चांगल्या नाहीत आणि बाथरूमही चांगले नाहीत. शेतातून दिसणारे दृश्य नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बनवायचे असेल तर ते आधुनिक बनवावे लागेल.
ICC Champion Trophy 2025: सामन्याच्या मैदानासाठी पीसीबी 12.8 अब्ज डॉलर्स खर्च करणार?
पीसीबी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम, कराचीतील नॅशनल स्टेडियम आणि रावळपिंडी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी काम करत आहे. यासाठी ते या स्टेडियममध्ये 12.8 अब्ज डॉलर्स (भारतीय चलनात सुमारे 1280 कोटी रुपये) गुंतवतील. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पीसीबीला ही स्टेडियम्स आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवायची आहेत.
नुकतेच मोहसीन नक्वी यांनी गद्दाफी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला होता. यावेळी ते म्हणाले की,
स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण केले जाईल. फ्रंटियर वर्क्स ऑर्गनायझेशन (FWO) चे कौतुक करताना ते म्हणाले, ‘आम्ही आमचे स्टेडियम अतिशय सुंदर बनवू. यावेळी, स्टेडियममध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे.याबाबत ते म्हणाले की, आशा आहे की स्पर्धेपूर्वी ते पूर्ण होईल.
पाकिस्तानला 21 ऑगस्टपासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीत मैदानावर होणार आहेत त्याआधी हे सर्व काम पूर्ण करायचा पाकिस्तान बोर्डाचा माणस आहे..
हेही वाचा:
- IND Vs SL 2th ODI Live:जेफ्री वँडरसेसने रचला इतिहास,एक दोन नाही तर भारताचे तब्बल एवढे खेळाडू केले बाद..
- ind vs sl Rohit sharma injured: तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी, आज खेळू शकणार की नाही?