ICC Champion Trophy 2025: यशस्वी की शुभमन? रोहित शर्मासोबत कोण करणार सुरवात? दिगाज खेळाडूने केले मोठे वक्तव्य..!

0
5
 ICC Champion Trophy 2025: यशस्वी की शुभमन? रोहित शर्मासोबत कोण करणार सुरवात? दिगाज खेळाडूने केले मोठे वक्तव्य..!

 ICC Champion Trophy 2025: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 नंतर परतणार आहे. पाकिस्तान पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. या स्पर्धेला अजून ६ महिने बाकी असले तरी, त्याची चर्चा जोरात सुरू आहे. कधी होस्टिंगबद्दल तर कधी संघांबद्दल चर्चा होते. आता भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेही असेच काहीसे केले आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारतीय संघाबाबत भाकीत केले आहे. नक्की काय आहे हे भाकीत जाणून घेऊया सविस्तर..!

 ICC Champion Trophy 2025: टीम इंडियाचा सलामीवर म्हणून रोहित शर्मासोबत कोण खेळेल?

यशस्वी जैस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात केली आहे, परंतु त्याला अद्याप एकदिवसीय कॅप मिळालेली नाही, दिनेश कार्तिकच्या मते, 22 वर्षीय युवा खेळाडू 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत भारतासाठी बॅकअप सलामीवीर राहील. कार्तिक म्हणाला की, यशस्वी जैस्वाल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही सलामी देणार नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल डावाची सुरुवात करेल.

ICC Champion Trophy 2025: पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मैदानासाठी करणार तब्बल एवढे कोटी रु खर्च, आकडा वाचून व्हाल चकित..!

ICC Champion Trophy 2025: काय म्हणाला दिनेश कार्तिक?

क्रिकबझ शोमध्ये कार्तिकला विचारण्यात आले की, “यशस्वी जैस्वाल रोहितसोबत ओपनिंग करेल की नाही?” या प्रश्नाचे उत्तर देताना कार्तिक म्हणाला, “होय, जैस्वालला बॅकअप ओपनर बनण्याची चांगली संधी आहे आणि जर शुभमनने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. त्याला लवकरच संधी मिळेल. भारताची मधली फळीही खूप मजबूत आहे.

 ICC Champion Trophy 2025:शुभमन गिलचा फॉर्म चांगला नाही!

गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच रोहित शर्मासोबत एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीसाठी भारत शुभमन गिलवर अवलंबून आहे. यासह शुभमनने 47 सामने खेळले. मात्र, त्याचा अप आणि डाऊन फॉर्म अलीकडे चर्चेचा विषय बनला आहे. विशेषत: जैस्वालच्या कसोटी आणि टी-20मधील चांगल्या कामगिरीनंतर त्याची अधिक चर्चा होऊ लागली आहे. शुभमनचा अलीकडचा फॉर्म तितकासा चांगला नाही. तो सतत संघर्ष करताना दिसतो.

 ICC Champion Trophy 2025: यावर कार्तिकचा विश्वास

कार्तिक म्हणाला, “भारत चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आणखी फक्त तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. मला विश्वास आहे की रोहित आणि शुभमन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामी देतील. भारत स्पर्धेपूर्वी फेब्रुवारीमध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळेल.” भारताचा शेवटचा एकदिवसीय सामना श्रीलंकेविरुद्ध 0-2 अशा फरकाने झाला.

 ICC Champion Trophy 2025: यशस्वी की शुभमन? रोहित शर्मासोबत कोण करणार सुरवात? दिगाज खेळाडूने केले मोठे वक्तव्य..!

चॅम्पियन्स ट्रॉफी कधी होणार?

आठ संघांची चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी ICC कॅलेंडरमध्ये परत येईल, 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये होणार आहे. तथापि, दोन देशांमधील ताणलेले राजकीय संबंध आणि 2008 पासून संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्यास भारत सरकारच्या अनिच्छेमुळे या स्पर्धेतील भारताचा सहभाग संशयाच्या भोवऱ्यात आहे. आता टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाते की नाही हे पाहायचे आहे.


हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here