आयसीसीने बदलले क्रिकेटमधील 4 महत्वाचे नियम, आता फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी ठरणार डोकेदुखी..
आयीसीसीने काही दिवसापूर्वी पुरुष आणि महिला क्रिकेट संघाच्या खेळामध्ये काही नवीन नियम लागू करणार असल्याची घोषणा केली होती. त्याच अनुसंगाने आता आयसीसीने काही नवीन नियम तर काही जुन्या नियमांमध्ये बदल केला आहे. काल हे नियम आयसीसीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहेत. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहेत ते नियम.
१)षटकांची गती न राखल्यास बसणार इन गेम पेनल्टी: क्रिकेटमधील षटकांच्या वेळेसंदर्भात सर्व नियम अगोदरच आसीसीने अनुच्छेद क्र. १३.८ मध्ये दिले आहेत.ज्यात हे लिहले गेले आहे की गोलंदाजी करणाऱ्या संघाने ठरवून दिलेल्या वेळेच्या आत अंतिम षटकाचा पहिला चेंडू टाकणे अनिवार्य आहे.
जर संघ असे नाही करू शकल्यास तो षटकांची गती न राखण्याच्या गुन्ह्यात शिक्षेस पात्र ठरू शकतो. परंतु आता त्यात थोडासा बदल करत जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने षटकांची गती राखली नाही आणि अंतिम षटक सुरु होण्याआधीच ठरठरवलेली वेळ निघून गेली तर ,अंतिम षटकामध्ये फक्त दोनच क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर ठेवू शकणार.
View this post on Instagram
म्हणजेच अंतिम षटक हे सरळ सरळ पॉवर प्ले षटक समजले जाईल.. आयसीसीच्या या नियमामुळे अंतिम षटकात गोलंदाजाला जास्त धावा पडू शकतात,कारण क्षेत्ररक्षणासाठी फक्त दोनच खेळाडू सीमारेषेवर असतील. आणि अंतिम षटकात सर्वच फलंदाज मोठे फटके खेळतात.
२) प्रत्येक पारीमध्ये वैयक्तिक ड्रिंक ब्रेक: आयसीसीने आणखी एका नियमात बदल करतांना म्हटले आहे की,प्रत्येक पारीमध्ये दोन मिनिट आणि 30 सेकंदाचाड्रिंक ब्रेक संघ त्याच्या वेळेनुसार घेऊ शकतो. फक्त ही वेळ ५व्या आणि नंतर 15व्या षटकाच्या नंतरची असावी.
३)lbw मध्ये गोलंदाजांसाठी मोठे स्टंप: आणखी एका महत्त्वपूर्ण नियमात बदल करताना, ICC ने असा निर्णय दिला की जर 50 टक्के चेंडू वरच्या गिलीला लागला तर बेलची उंची LBW/DRS मध्ये ग्राह्य धरली जाईल. जुन्या नियमात, चेंडू गिलीवर आदळला की निर्णय अंपायर कॉलकडे जातो. मात्र त्यात आता बदल करून अर्धा चेंडू बेल्सच्या संपर्कात आल्यास मैदानावरील निर्णय बदलला जाऊ शकतो. हा बदल थोडा तांत्रिक आहे, पण त्यामुळे जमीन समीकरणात आणून गोलंदाजांना एलबीडब्ल्यू कॉलची अधिक संधी मिळाली आहे.

४)जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2021-23. संख्या स्वरूपात बदल: 2021-23 मधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन फेरीचा भाग म्हणून, ICC ने जाहीर केले की मागील आवृत्तीच्या विपरीत, प्रत्येक WTC सामन्याला त्यांच्या निकालांवर आधारित गुण दिले जातील
. याआधी, सर्व मालिकांमध्ये, मग ती 3 सामन्यांची असो किंवा 5 सामन्यांची, त्याचे 120 गुण होते. या नव्या नियमामुळे आयसीसीने गुण देण्याची प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. संघांना आता त्यांनी खेळलेल्या गुणांची टक्केवारी आणि त्यांनी जिंकलेल्या सामन्यांच्या संख्येनुसार क्रमवारी लावली जाते.