ICC ODI Rankings: शुभमन गिलला मोठा धक्का, बाबर आझमच ठरला पुन्हा किंग; एवढ्या अंकांनी गेला समोर..

0
17
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ICC ODI Rankings: भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलला ICC क्रमवारीत एका नंबरने कमीपणाला सामोरे जावे लागले आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत फलंदाजांच्या क्रमवारीत गिल दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा अव्वल क्रमवारीत पोहोचला आहे. या क्रमवारीत भारताचा महान फलंदाज विराट कोहली आणि अनुभवी रोहित शर्मा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

ICC ODI Rankings: आयीसीने जाहीर केली नवीन आकडेवारी, गिल काही दिवसांसाठी राहू शकला नंबर 1 .

ICC ODI Rankings: शुभमन गिलला मोठा धक्का, बाबर आझमच ठरला पुन्हा किंग; एवढ्या अंकांनी गेला समोर..

24 वर्षीय शुभमन गिल आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर थोड्या काळासाठीच राहू शकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने त्याला पहिल्या स्थानावरून हटवले. शुभमन गिलने गेल्या महिन्यात एकदिवसीय विश्वचषक-2023 दरम्यान क्रमवारीत अव्वल स्थान गाठले होते. मात्र, विश्वचषकानंतर तो एकही वनडे सामना खेळलेला नाही.

ICC ODI Rankings: बाबर आणि शुभमनमध्ये 14 अंकांचा फरक.

बाबर ८२४ रेटिंग गुणांसह अव्वल तर शुभमन (८१०) दुसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत त्याच्यानंतर भारतीय संघातील अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. विराटचे 775 रेटिंग गुण आहेत, तर रोहितचे 754 रेटिंग गुण आहेत. श्रेयस अय्यर 12 व्या स्थानावर तर लोकेश राहुल एका स्थानाने 16 व्या स्थानावर घसरला आहे. केएल राहुल सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.

ICC BOWLING ODI Rankings: केशव महाराज अव्वल.

गोलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज अव्वल स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुसऱ्या आणि भारताचा मोहम्मद सिराज तिसऱ्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह (पाचवा) आणि कुलदीप यादव (आठव्या) टॉप-10 मध्ये इतर भारतीय आहेत.

उद्यापासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शुभमन गिलला खास विक्रम करण्याची संधी, विराट कोहलीला सोडू शकतो मागे..

अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 11व्या तर फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा 22व्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत फारसा बदल झालेला नाही आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन अव्वल स्थानावर कायम आहे. अव्वल-२० मध्ये जडेजा (१२वा) आणि हार्दिक पंड्या (१७वा) या दोनच भारतीयांचा समावेश आहे.

ICC T-20 Rankings: सूर्यकुमार T20 मध्ये टॉपर

भारताचा मिस्टर 360 डिग्री सूर्यकुमार यादव T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान गाठणारा इंग्लंडचा आदिल रशीद हा देशातील दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी ग्रॅम स्वान या फॉरमॅटमध्ये इंग्लंडचा अव्वल वेगवान गोलंदाज बनला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सध्याच्या मालिकेतील चार T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 7 बळी घेत त्याने अफगाणिस्तानच्या राशिद खानला दुसऱ्या स्थानावर ढकलले. या यादीत भारताचा रवी बिश्नोई तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी-20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये शाकिबची राजवट कायम आहे तर हार्दिक चौथ्या क्रमांकावर अव्वल भारतीय आहे.

ICC TEST RANKING: केन विल्यमसन कसोटीत अव्वल आहे

कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याच्यानंतर इंग्लंडचा जो रूट (दुसरा) आणि स्टीव्ह स्मिथ (तिसरा) येतो. या क्रमवारीत भारतीय कर्णधार रोहित दहाव्या स्थानासह देशातील अव्वल खेळाडू आहे.

कसोटी गोलंदाजांच्या यादीत भारताचा अनुभवी रविचंद्रन अश्विन पहिल्या तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दमदार गोलंदाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आणि त्याला आयपीएल लिलावात 20.5 कोटी रुपये मिळाले.

Lord's Test : आम्ही इंग्लंडच्या जागी असतो तर जिंकण्यासाठी खेळलो असतो : Kane  Williamson

रवींद्र जडेजा चौथ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचे वर्चस्व टॉप-10 मध्ये आहे, ज्यात कमिन्स व्यतिरिक्त नॅथन लियॉन (5वा), मिचेल स्टार्क (8वा) आणि जोश हेझलवुड (10वा) यांचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये जडेजा आणि अश्विनची नावे टॉप-2 मध्ये आहेत तर अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..