आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीचा शुभमन गिल- मोहम्मद सिराजला फायदा, थेट या पुरस्कारासाठी मिळाले नामांकन. दोघांपैकी एकाला पुरस्कार निच्छित..
क्रिकेट विश्वचषक 2023 दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सप्टेंबर महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. ICC पुरूष खेळाडूसाठी निवडलेल्या तीन खेळाडूंमध्ये भारताचा एक युवा फलंदाज आणि एका वेगवान गोलंदाजाचा समावेश आहे, ज्याने गेल्या महिन्यात भारताला आशिया चषक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर इंग्लंडच्या एका दमदार सलामीवीराचाही दावेदारांच्या यादीत समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या खेळाडूंना सप्टेंबर महिन्याच्या ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
आशिया चषक 2023 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने आपला दावा पक्का केला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मलानने जबरदस्त फलंदाजी करत भरपूर धावा केल्या. त्यामुळे त्यांची प्रथमच या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्काराचे विजेते हे चाहत्यांच्या मतदानाद्वारे निश्चित केले जातील.
या 3 खेळाडूंना मिळाले ‘प्लेयर ऑफ द मंथ’ चे नॉमिनेशन.
1. शुभमन गिल (भारत)

भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने गेल्या काही काळापासून आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. सप्टेंबर महिन्यात गिलने खूप धावा केल्या आहेत. त्याने गेल्या महिन्यात आशिया कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आणि भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गिलने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि त्याच्या बॅटने एकूण 302 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये 74 आणि 104 धावांची इनिंग खेळली होती. अशाप्रकारे गेल्या महिन्यात त्याने उत्कृष्ट फॉर्म दाखवत 8 सामन्यांत 80 च्या उत्कृष्ट सरासरीने 480 धावा केल्या. अशा स्थितीत त्याच्या दुसऱ्यांदा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार जिंकण्याची शक्यता जास्त आहे.
२. मोहम्मद सिराज (भारत)
मोहम्मद सिराजबद्दल सांगायचे झाले तर, त्याच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे त्याने गेल्या महिन्यात आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवला. आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात सिराजने श्रीलंकेविरुद्ध केवळ 21 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या आणि संपूर्ण संघ अवघ्या 50 धावांवर ऑलआऊट झाला होता. ऑस्ट्रेलिया मालिकेतही त्याने एकच सामना खेळला आणि 1 बळी घेतला. अशाप्रकारे गेल्या महिन्यात त्याने 6 सामन्यात 17.27 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत सिराजला या ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
3. डेव्हिड मलान (इंग्लंड)
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड मलानने 2023 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर चार सामन्यांची मालिका खेळली. ज्यामध्ये मलानने तीन सामन्यांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या (अनुक्रमे 54, 96 आणि 127) सहाय्याने 277 धावा केल्या आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही जिंकला. सप्टेंबरमध्ये त्याने एकदिवसीय सामन्यात 92.33 च्या सरासरीने 277 धावा केल्या. अशा परिस्थितीत तो गिलला या आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी स्पर्धा देईल.
महिला गटातील ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी दावेदार
महिलांच्या गटात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि अष्टपैलू नदिन डी क्लर्क आणि श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टू यांची या ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या तिन्ही खेळाडूंनी गेल्या महिन्यात चांगली कामगिरी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.
PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..