ICC team of Year 2023: पाकिस्तानच्या एकाही खेळाडूंना नाही मिळाली आयसीसीच्या संघात जागा, सोशल मिडीयावर होतेय पाकिस्तान टीम तुफान ट्रोल..

ICC team of Year 2023: पाकिस्तानच्या एकाही खेळाडूना नाही मिळाली आयसीसीच्या संघात जागा, सोशल मिडीयावर होतेय पाकिस्तान टीम तुफान ट्रोल..

ICC team of Year 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी सर्व फॉरमॅटसाठी संघांची घोषणा केली. ज्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा एकही खेळाडू ICC संघ 2023 मध्ये स्थान मिळवू शकला नाही. एकदिवसीय विश्वचषक 2023 पासून पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत खराब आहे. विश्वचषकानंतर पाकिस्तान संघाने एक कसोटी आणि एक टी-२० मालिका खेळली आहे.

पाकिस्तान संघाला कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून 3-0 आणि टी-20 मालिकेत न्यूझीलंडकडून 4-1 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता एकाही पाकिस्तानी खेळाडूला आयसीसी संघात स्थान मिळू शकलेले नाही. आता पाकिस्तान क्रिकेट संघाला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागत आहे.

ICC team of Year 2023 घोषणेनंतर सोशल मीडियावर पाक टीम झाली तुफान ट्रोल .

पाकिस्तान क्रिकेट संघासाठी 2023 हे वर्ष खूप वाईट गेले. संघाला बहुतांश सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातही पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. यानंतर बाबर आझमचे कर्णधारपदही गेले. आता 2024 ची सुरुवातही पाकिस्तान संघासाठी खूपच खराब झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानी संघाने आतापर्यंत दोन मालिका गमावल्या आहेत.

ICC team of Year 2023: पाकिस्तानच्या एकाही खेळाडूना नाही मिळाली आयसीसीच्या संघात जागा, सोशल मिडीयावर होतेय पाकिस्तान टीम तुफान ट्रोल..

आता एकाही पाकिस्तानी खेळाडूला आयसीसी संघात स्थान न मिळाल्याने या संघाची सोशल मीडियावर खूप खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियावर एका यूजरने लिहिले की,  त्यांच्यासोबत ‘मोये-मोये’ झाला आहे. आणखी एका युजरने लिहिले की, आयसीसी टूर्नामेंटमधील पाकिस्तानी संघाची कामगिरी पूर्णपणे लज्जास्पद आहे, आयसीसीच्या कोणत्याही वर्षात पाकिस्तानी संघ पुरस्कार विजेता ठरला नाही. दुसर्‍या यूजरने लिहिले की, हा जगातील सर्वोत्तम जोक आहे, बाबर आझम नंबर 1 खेळाडू आहे.

न्यूझीलंडकडून टी-20 मालिकेत 4-1 ने पराभव

अलीकडेच पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडसोबत 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी आला होता. या मालिकेत पाकिस्तान संघाला सलग 4 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तान संघाला केवळ शेवटचा सामना जिंकता आला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाला मालिकेत ४-१ ने पराभवाचा सामना करावा लागला. टी-20 मालिकेत पाकिस्तान संघाची कमान शाहीन शाह आफ्रिदीकडे होती. या मालिकेत शाहीनच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.


हेही वाचा:

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *