जसप्रीत बुमराह आयपीएल खेळणार का? मोठी अपडेट आली समोर..

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरू असलेल्या कसोटी मालिकेत देखील संधी दिली गेली नाहीये. तर आगामी वनडे मालिकेत देखील तो खेळताना दिसून येणार नाहीये. असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, तो आयपीएल स्पर्धेत कमबॅक करेल. दरम्यान आता त्याच्या आयपीएल खेळण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
आयपीएल २०२३ स्पर्धेला येत्या ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत कोण कोणते खेळाडू ॲक्शन मोड दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. जो गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुमराहला अजूनही एनसीएकडून अनुमती दिली गेली नाहीये. त्यामुळे तो आयपीएल २०२३ स्पर्धा खेळणार की नाही याबाबत कुठलीही माहिती दिली गेली नाहीये.
असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, जसप्रीत बुमराह इंदोर आणि अहमदाबाद कसोटीत खेळताना दिसून येऊ शकतो. मात्र निवडकर्त्यांनी त्याला उर्वरित २ कसोटी सामन्यासाठी आणि वनडे मालिकेसाठी संधी दिली नाहीये. जसप्रीत बुमराह सप्टेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर तो अजूनही कमबॅक करू शकला नाहीये.