रविवारी झालेल्या सामन्यात भारताने गत चॅम्पियन इंग्लंडच्या संघाचा 100 धावांनी पराभव केला. सामन्या नंतर भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी बेस्ट फिल्डर ऑफ द डे ची घोषणा केली. ही घोषणा करण्यासाठी त्यांनी एका नव्या फॉरमॅटचा वापर केला. गोल्ड मेडल पदक विजेता खेळाडूंचे नाव जाहीर करण्यासाठी वापरलेली नवी पद्धत पाहून विराट कोहली सह अनेक खेळाडू चकित झाले. बीसीसीआयने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला दिलीप यांनी ड्रेसिंग रूममध्ये भारतीय खेळाडूंना काही संदेश देत आहेत. पदक देण्यापूर्वी ते खेळाडूंची संवाद साधत असताना म्हणाले की, मैदानामध्ये ओस प्रचंड होता. फिरकी गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. यामध्ये क्षेत्ररक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तीस यार्डच्या सर्कलमध्ये थांबलेले रोहित, विराट, जडेजा यांनी अफलातून क्षेत्ररक्षण केले. सतत चेंडू कोरडा करण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे गोलंदाजांना चांगली मदत झाली. या सगळ्या गोष्टी आम्ही नोटीस करून ठेवल्या. सगळ्यांचे अभिनंदन. त्यानंतर दिलीप यांनी ईशान किशन व मोहम्मद सिराज यांच्या क्षेत्ररक्षणाचे देखील कौतुक केले. ईशान हा सब्स्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानात आला होता.
त्यानंतर दिलीप यांनी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कसे निवडले याबद्दल बोलताना म्हणाले की, हे पदक केवळ आकड्यांसाठी नाही किंवा एखादा अप्रतिम झेल घेतल्याबद्दल किंवा धावा रोखल्याबद्दल नाही. संघामध्ये सामील राहून खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो. याचा सामन्यावर चांगला परिणाम घडून येतो आणि या सगळ्यांचा विचार करून पदक दिला जातो. आमच्या मॅच हिरोचे योगदान येथे आहे. कधी-कधी गोष्टी रडारच्या खाली जातात, पण या गोष्टींकडे लक्ष जात नाही.
खेळाडूचे संवाद साधल्यानंतर दिलीप यांनी खेळाडूंना बाल्कनीत यायला सांगतात. त्यानंतर स्टेडियम मधील सर्व लाईट बंद केल्या जातात. लाईट शोच्या साह्याने विजेत्याचे नाव घोषित केले जाते. त्या लाईट मध्ये के एल राहुल याचे नाव लिहिलेले होते. श्रेयश अय्यर बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड के एल राहुल याला बहाल करतो. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत केएल राहुल ला दुसऱ्यांदा बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देण्यात आला. यापूर्वी त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात देखील बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देण्यात आला होता. या स्पर्धेत श्रेयस अय्यर, जडेजा, कोहली यांना पदक देण्यात आले होते.
बीसीसीआयने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून त्यांच्या ट्विटर हँडल वर शेअर केले आहे. जो अल्पावधीतच वायरल झाला. व्हिडिओमध्ये के एल राहुल बाहुबली स्टाईलने बसून मेडल स्वीकारले. त्यानंतर राहुलने एखाद्या ऍथलिट सारखे पदक तोंडात धरून फोटो काढले.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात के एल राहुल याने इंग्लंडच्या एका खेळाडूचा झेल घेतला व एकाला स्टम्प आउट केले. मोईन आली याचा एक सुंदर झेल त्याने टिपला होता तसेच कर्णधार जोश बटलर याला स्टंप आऊट केले होते. यापूर्वी फील्डिंग कोच दिलीप यांनी प्रत्येक वेळेस बेस्ट फिल्टरचे घोषणा वेगवेगळ्या पद्धतीने केली होती पहिल्यांदा त्यांनी स्टेडियम मोठ्या स्क्रीनवर तर कधी स्पायडर कॅम्प च्या माध्यमातून विजेत्या खेळाडूची घोषणा केली होती. पुढच्या सामन्यात कशा पद्धतीने पदक विजेत्या खेळाडूची घोषणा करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.