NED vs BAN: नेदरलँडचा 87 धावांनी धमाकेदार विजय; बांगलादेशच्या खेळाडूंना करावे लागणार ‘पॅकअप’

0
21
ad

विश्वचषक 2023 मध्ये सुरुवातीच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिका सारख्या मातब्बर संघाला आणि काल शनिवारी बांगलादेशला हरवून पुन्हा एकदा नेदरलँड संघाने स्पर्धेत उलटफेअर घडवून आणला. ईडन गार्डन मैदानवर झालेल्या सामन्यात नेदरलँडचा कर्णधार व यष्टीरक्षक स्कॉट एडवर्ड्स यांनी 68 धावांची झुंजार खेळी तसेच वेगवान गोलंदाज पॉल व्हॅन मिकेरिन (4/23) याच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशचा 87 धावाने दणदणीत पराभव केला. बांगलादेशच्या या पराभवानंतर विश्वचषक स्पर्धेतून त्यांना पॅकअप करावे लागले आहे.

सुरुवातीला नाणेफेक जिंकून नेदरलँड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड ने 50 षटकात 10 सर्वबाद 229 धावा केल्या. प्रतिउत्तरात बांगलादेशचे सर्व फलंदाज 42.2 षटकात 142 धावांवर सर्वबाद झाले. बांगलादेशच्या चार फलंदाजांना 10 चा आकडा देखील पार करता आला नाही. या विजयासह नेदरलँडचा संघ या स्पर्धेत आपले आव्हान कायम टिकून आहे.

फुटबॉल प्रेमी असलेल्या नेदरलँड देशाच्या संघाने आता क्रिकेटमध्ये देखील छाप सोडायला सुरुवात केली आहे. नेदरलँडचा संघ 1994 साली पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्यानंतर 1996 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला विश्वचषक खेळला त्यानंतर 2003, 2007 आणि 2011च्या विश्वचषकात त्यांना म्हणावी तशी छाप सोडता आली नाही. त्यानंतर तब्बल 12 वर्षानंतर क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनर्रगमन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

नेदरलॅंडचा कर्णधार यष्टीरक्षक फलंदाज स्कॉट एडवर्ड्स याने सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा विक्रम केला आहे. त्यांने 44 सामन्यात तब्बल 15 अर्धशतके ठोकली आहेत. त्याने माजी खेळाडू आरएन टेन डचचॅट याला पाठीमागे टाकले. त्याने 33 वनडे सामन्यात 14 अर्धशतके ठोकली होती.

स्कॉट एडवर्ड्स याने त्याच्या खेळीमध्ये सहा चौकार ठोकले. तसेच वेसली बॅरेसीने 41 धावांची उपयुक्त खेळी केली. बांगलादेशच्या गोलंदाजाने सुरुवाती पासूनच नेदरलँडच्या फलंदाज वर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजाने दमदार प्रदर्शन केले मुस्तफिजूर रहमान, टस्किन अहमद,शौरिफुल इस्लाम यांनी धमाकेदार सुरुवात करत प्रत्येकी दोन विकेट घेतले.

स्कॉट एडवर्ड्स ने नेदरलँड चा डाव सांभाळत अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे नेदरलँड चा संघ 200 च्या पुढेधावा करू शकला. नेदरलँड चा पाल वान मिकेरियन याने चार गडी बात केले तर बास डि लीडे याने दोन गडी बाद करण्यात यश मिळवले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत लिडे याने 11 तर मीकेरन याने 10 गडी बाद केले आहेत.

बांगलादेशने ईडन गार्डनच्या मैदानावर दुसरा सामना जवळपास तीन दशकानंतर खेळला. म्हणजेच दुसरा वन डे खेळण्यासाठी त्यांना 33 वर्षांची वाट पाहावी लागली. बांगलादेश नाही यापूर्वी याच मैदानावर 1990 मध्ये आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध सामना खेळला होता त्यात त्यांना 71 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नेदरलँड संघाने विश्वचषक स्पर्धेतला हा दुसरा विजय ठरला आहे. 2011 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ईडन गार्डनच्या या मैदानावर नेदरलँडचा आयर्लंडच्या संघाने सहा गडी राखून पराभव केला होता.