प्रामुख्याने आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे परंतु आपल्या देशात सर्वाधिक लोकांना क्रिकेट खेळाचे वेड आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकालाच क्रिकेट चे वेड आहे हे आपल्याला माहीतच आहे.

क्रिकेट सामन्यादरम्यान अनेक प्रसंग घडतात हे आपल्याला माहीतच आहे. काही हास्यास्पद असतात तर काही खुन्नस प्रकारचे असतात एका सामन्यादरम्यान युवराज सिंग आणि ख्रिस गेल यांच्यात नक्की कोणता प्रसंग घडलेला हे आम्ही आपणास सांगणार आहोत.
बऱ्याच वेळा आपल्याला क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूंमध्ये वाद आणि भांडणे होताना दिसतात. काहीवेळेस खेळाडू तर एकमेकांच्या अंगावर सुद्धा धाऊन जातात. हे आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल. काही वेळेस तर अगदी टोकाला भांडणे जातात.
एका सामन्यादरम्यान असाच प्रसंग घडला भारतीय संघाचा स्टार फलंदाज युवराज सिंग आणि ख्रिस गेल यांच्यात वाद झाला होता. आयपीएल च्या आठव्या सिझन मध्येच दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू होता. ख्रिस गेल बेंगळुरूकडून फलंदाजी करत होता तर युवराज सिंग हा दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी मैदानात खेळत होता. परंतु पावसामुळे हा सामना काही काळासाठी थांबवण्यात आला होता.
याचदरम्यान ख्रिस गेल पटकन त्याच्या बॅटने युवराज सिंगच्या दिशेने धावला आणि युवराज सिंग ला बॅट मारण्याचा इशारा केला. परंतु गेलने हे सर्व मजेशीर पद्धतीने केले होते. परंतु ख्रिस गेल खूप गंभीर आहे आणि तो असं का करतोय असं सगळ्याच चाहत्यांना वाटलं. ख्रिस गेल हा त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखला जातो आणि त्याने युवराज सिंगसोबत विनोदही केला.