IND vs AFG: टाय, सुपर ओव्हर पण टाय, पुन्हा दुसरी सुपर ओव्हर.. रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा विजय, अफगाणिस्तानला सिरीजमध्ये 3-0 ने क्लीन स्वीप..

0

IND vs AFG 3RD T-20 Highlights:  भारतीय संघाने बुधवारी अफगाणिस्तान विरुद्ध बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात सुपर ओव्हर जिंकली. सामन्याचा निर्णय 2 सुपर ओव्हरने घेण्यात आला. भारतीय संघाने दुसरा सुपर ओव्हर जिंकला. त्यामुळे यजमानांनी मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला.

IND vs AFG: 2 सुपर ओव्हरनंतर लागला सामन्याचा निर्णय..

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील या तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माचे नाबाद शतक आणि रिंकू सिंग (नाबाद 69) सोबतच्या 190 धावांच्या भागीदारीमुळे भारताने 4 गडी गमावून 212 धावा केल्या. यानंतर पाहुण्या संघाने 23 चेंडूत गुलबदिन नायबच्या नाबाद 55 धावांच्या खेळीमुळे 6 गडी बाद 212 धावा जोडल्या. गुलबदीन नायबने नाबाद खेळीत 4 चौकार आणि तब्बल षटकार ठोकले.

त्याच्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज (५०) आणि कर्णधार इब्राहिम झद्रान (५०) यांनीही अर्धशतके झळकावली. त्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी 16-16 धावा जोडल्या. याचा परिणाम दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दिसून आला, जेव्हा भारताने 11 धावांचा बचाव केला. रवी बिश्नोईच्या या षटकात अफगाणिस्तानने केवळ 1 धावात 2 विकेट गमावल्या.

IND vs AFG: रोहित आणि रिंकूने 190 धावा जोडल्या.

तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 212 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंगने फटकेबाजी करत वादळ निर्माण केले. रोहितने नाबाद 121 तर रिंकूने नाबाद 69 धावा केल्या. दोघांनी मिळून 5व्या विकेटसाठी 190 धावांची नाबाद भागीदारी केली. कोणत्याही विकेटसाठी ही भारताची टी-20 मधील सर्वोत्तम भागीदारी आहे. रोहितने 69 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकार मारले, तर रिंकूने 39 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकार ठोकले. अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने सर्वाधिक ३ बळी घेतले.

IND vs AFG: टाय, सुपर ओव्हर पण टाय, पुन्हा दुसरी सुपर ओव्हर.. रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा विजय, अफगाणिस्तानला सिरीजमध्ये 3-0 ने क्लीन स्वीप..

IND vs AFG: अफगाणिस्तानने जबरदस्त ताकद दाखवली.

213 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची झंझावाती सुरुवात झाली. रहमानउल्ला गुरबाज आणि कर्णधार इब्राहिम झद्रान यांनी मिळून केवळ 5.5 षटकांत धावसंख्या 50 धावांपर्यंत नेली. दोघांनी अर्धशतके झळकावली आणि 11 षटकात 93 धावांची सलामी भागीदारीही केली. कुलदीप यादवने गुरबाजला बाद करून ही भागीदारी तोडली.

गुरबाजने 32 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 50 धावा केल्या. झद्रानने (50) 41 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारला. मोहम्मद नबीने 16 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 34 धावा जोडल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 3 षटकांत 18 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज आवेश खान आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave A Reply

Your email address will not be published.