IND vs AFG 3RD T-20I: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघ तिसरा सामना जिंकून अफगाणिस्तानला मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप करू इच्छितो. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक-दोन बदल दिसू शकतात.
IND vs AFG 3RD T-20I :संजू सॅमसन परत येऊ शकतो.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संजू सॅमसनचाही टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनचा अद्याप समावेश झालेला नाही. त्याच्या जागी दुसरा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला दोन सामन्यांमध्ये संधी देण्यात आली. आता जितेश शर्माला विश्रांती देऊन तिसऱ्या सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनचा समावेश होण्याची शक्यता आहे.
संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला असला तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नसल्याचे अनेक मालिकांमध्ये पाहायला मिळते. अफगाणिस्तानविरुद्धच्या या टी-20 मालिकेतही असेच काहीसे पाहायला मिळाले.
IND vs AFG 3RD T-20I :आवेश खानला संधी मिळू शकते.
या मालिकेतील वेगवान गोलंदाज आवेश खानचाही संघात समावेश करण्यात आला आहे. आवेश खानलाही पहिल्या दोन टी-२० सामन्यांमधून वगळण्यात आले होते. आता तिसऱ्या टी-२० सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे. याआधी आवेश खानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या वनडे आणि टी-२० संघात समावेश करण्यात आला होता. आवेश खानने टीम इंडियासाठी आतापर्यंत 19 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 18 विकेट आहेत.