IND vs AFG 3rd T20: आज तिसऱ्या टी-२० मध्ये विजय मिळवताच रोहित शर्मा रचणार इतिहास, महेंद्रसिंग धोनीला मागे सोडून असी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय कर्णधार..

IND vs AFG 3rd T20: आज तिसऱ्या टी-२० मध्ये विजय मिळवताच रोहित शर्मा रचणार इतिहास, महेंद्रसिंग धोनीला मागे सोडून असी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय कर्णधार..

IND vs AFG 3rd T20: भारतीय क्रिकेट संघ सध्या अफगाणिस्तान विरुद्ध T20 मालिका खेळत आहे. भारत आणि अफगाणिस्तानचे खेळाडू मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यासाठी बेंगळुरूला पोहोचले आहेत. जर यजमानांनी हा सामना जिंकला तर, रोहित शर्मा एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

कर्णधार रोहित शर्मा एका बाबतीत महान महेंद्रसिंग धोनीला (एमएस धोनी) मागे टाकेल. जर आज टीम इंडियाने सामना जिंकला तर, रोहित शर्भामारतासाठी सर्वाधिक टी-२० जिंकणारा कर्णधार बनेल.

IND vs AFG: टीम इंडियापुढे इतिहास रचण्याची संधी..! तिसरा टी-२० सामना जिंकल्यास टीम ईंडीया ठरणार अशी कामगिरी करणारा पहिला संघ..

शानदार सलामीवीर रोहित शर्मा सध्या भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करत आहे. भारतीय संघाने नव्या वर्षाची सुरुवात शानदार शैलीत केली. T20 विश्वचषकापूर्वीच्या शेवटच्या मालिकेत भारताने अफगाणिस्तानविरुद्ध 2-0 अशी अभेद्य आघाडी कायम ठेवली आहे. रोहितने या फॉरमॅटमध्ये शानदार स्टाईलमध्ये पुनरागमन केले. सप्टेंबर-2022 नंतर तो प्रथमच भारतीय T20 संघाचा भाग बनला आणि त्याने सलग दोन्ही T20 सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला.

 

IND vs AFG 3rd T20: धोनीच्या विक्रमापासून रोहित शर्मा एक पाऊल दूर..

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत रोहित शर्माची बॅट आतापर्यंत शांत असली तरी त्याने महान महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. रोहित शर्मा टी-20 फॉरमॅटमधील महान धोनीचा विक्रम मोडण्यात फक्त एक पाऊल मागे आहे. आत्तापर्यंत धोनीने टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विजय मिळवले होते, मात्र दुसऱ्या टी-20 नंतर रोहित शर्माने त्याची बरोबरी केली. आता रोहित शर्मा बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार्‍या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या T20 मध्ये विजय नोंदवताच माजी कर्णधार धोनीला मागे सोडेल. रोहित आणि धोनीने आतापर्यंत T20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 41-41 विजयांची नोंद केली आहे.

IND vs AFG 3rd T20: आज तिसऱ्या टी-२० मध्ये विजय मिळवताच रोहित शर्मा रचणार इतिहास, महेंद्रसिंग धोनीला मागे सोडून असी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय कर्णधार..

IND vs AFG 3rd T20: रोहित धोनीला मागे टाकणार?

रोहित शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 150 पैकी 53 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्याच वेळी धोनीने 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 72 सामन्यांमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळली. रोहित आणि धोनीने कर्णधारपद भूषवले आणि यापैकी ४१-४१ सामने जिंकले. आता तिसऱ्या T20 मध्ये अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर रोहित शर्मा महान यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला मागे टाकेल. आत्तापर्यंत, पाकिस्तानचा बाबर आझम, अफगाणिस्तानचा असगर अफगाण आणि इंग्लंडचा इऑन मॉर्गन यांच्या नावावर टी-20 फॉर्मेटमध्ये कोणत्याही कर्णधारासाठी सर्वाधिक विजय आहेत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in | All Rights Reserved.

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: शिवम दुबे ने ठोकले एवढे जबरदस्त षटकार की, कर्णधार रोहित शर्माआणि विराट कोहलीही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

IPL 2024: नीता अंबानीने घेतला मोठा निर्णय… ना रोहित शर्मा ना हार्दिक पांड्या, हा खेळाडू सांभाळणार आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *