IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेला गुरुवारपासून (11 जानेवारी) सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून त्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांचे पुनरागमन झाले आहे. या दोघांचाही नोव्हेंबर २०२२ नंतर प्रथमच T20I संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, स्टार यष्टीरक्षक इशान किशन आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर या दोन युवा खेळाडूंना संघात स्थान मिळालेले नाही.
आता हे दोघेही फिट असतांना यांच्याकडे हा दुर्लक्ष केले गेले? असा सवाल चाहते विचारत असतांना यावर टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी शेवटी खुलासा केला आहे. नक्की निवडकर्ते काय म्हणाले जाणून घेऊया सविस्तर.
या प्रश्नावर बोलतांना टीम इंडियाचे निवडकर्ते म्हणाले की, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना शिस्तभंगाच्या कारणास्तव शिक्षा म्हणून अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियात निवडण्यात आले नाही.
निवडकर्ते इशानच्या वागण्यावर नाराज होते. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघाचा भाग होता, मात्र काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारणांमुळे तो मालिकेतून परतला होता. यानंतर किशन एका बर्थडे पार्टीतही दिसला होता. याशिवाय तो एका टीव्ही शोमध्येही दिसला होता. याच कारणामुळे त्याची निवड झालेली नाही.
तर, श्रेयस अय्यरबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या शॉटच्या निवडीमुळे निवडकर्ते नाराज झाले होते. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेदरम्यान त्याची शॉट सिलेक्शन खूपच नकारात्मक होती. यामुळे निवड समितीने त्याला रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी पाठवले आहे. 12 जानेवारीपासून आंध्र प्रदेशविरुद्ध सुरू होणाऱ्या सामन्यासाठी अय्यरचा मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे. आता रणजी खेळल्यानंतरच श्रेयस अय्यरला भारतीय टी-२० संघात संधी मिळू शकते.
IND vs AFG: प्रथम श्रेणी क्रिकेट गांभीर्याने न घेणारे खेळाडू निवड समितीच्या निशाण्यावर असणार..
अहवालानुसार, कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेट डोळ्यासमोर न ठेवणाऱ्या खेळाडूंशी गंभीरपणे वागण्याचा निवड समितीचा मानस आहे. रिंकू सिंगची मेहनत पाहून निवडकर्ते लवकरच त्याचा कसोटी संघात समावेश करू शकतात. तर दुसरीकडे काही खेळाडूंना फक्त त्यांच्या वागणुकीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर बसावे लागले आहे.
हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..