IND vs AFG LIVE: कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात काही बदल, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IND vs AFG LIVE

IND vs AFG LIVE Updates: भारत आणि अफगाणिस्तान  (IND vs AFG LIVE) यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका खेळली जात आहे. मोहालीतील पीसीए स्टेडियमवर पहिला सामना होणार आहे. ही मालिका 11 ते 17 जानेवारी दरम्यान आयोजित केली जाणार आहे. रोहित शर्माचे तब्बल 14 महिन्यांनंतर T20 मध्ये कर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे. विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिला T20 खेळत नाहीये.

IND vs AFG 1ST T-20: मोहालीमध्ये आज भिडणार भारत-अफगाणिस्तान, मात्र चाहत्यांसाठी वाईट बातमी, सामना होऊ शकतो रद्द, पहा काय आहे नक्की कारण..

IND Vs AFG 1st T20 LIVE: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय..

 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 14 महिन्यांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन करताना नाणेफेक जिंकली आहे. यानंतर त्याने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. म्हणजे अफगाणिस्तान संघ प्रथम खेळताना दिसेल.

IND Vs AFG 1st T20 LIVE: रोहित शर्मा 14 महिन्यांनंतर परतला.

रोहित शर्मा शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय टी20 वर्ल्ड कप 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध खेळला होता. हा सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. आता 14 महिन्यांनंतर हिटमॅन या फॉरमॅटमध्ये परतला आहे आणि तोही कर्णधार म्हणून.

IND vs AFG LIVE

भारतीय संघाची प्लेईंग 11

रोहित शर्मा ((कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे,जितेश शर्मा (यष्टीरक्षक ), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

 

 

अफगाणिस्तान संघाची प्लेईंग 11

इब्राहिम झद्रान(c), रहमानउल्ला गुरबाज (वि.), रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी , नवीन उल हक, मुजीब उर रहमान


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *