IND vs AFG: शून्यावर बाद होऊनही कर्णधार रोहित शर्माने रचला इतिहास, T- 20 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू..

0
3

IND vs AFG:भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना काल (11 जानेवारी)  मोहालीच्या MCA स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने 14 महिन्यांनंतर टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

या सामन्यात रोहित शर्माला फलंदाजीत फारशी कामगिरी करता आली नाही. तो धावबाद झाला पण ,शून्यावर बाद झाल्यानंतरही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक विशेष कामगिरी नोंदवली गेली आहे.

IND vs AFG: रोहित शर्मा ठरला T20 क्रिकेटमध्ये 100 सामने जिंकणारा एकमेव खेळाडू.

अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. यानंतरही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला आहे. रोहित शर्मा आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या नावावर खेळाडू म्हणून 99 टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रम होता. आता एक खेळाडू म्हणून 100 T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा रोहित जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

IND vs AFG: भारताने हा सामना 6 विकेटने जिंकला.

भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 गडी राखून जिंकला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकात 5 गडी गमावून 158 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना मोहम्मद नबीने 27 चेंडूत सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान नबीने 2 चौकार आणि 3 शानदार षटकार मारले. याशिवाय अजमतुल्लाने 29 धावांची खेळी खेळली. भारताकडून गोलंदाजी करताना मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी सर्वाधिक २-२ बळी घेतले.

IND vs AFG: शून्यावर बाद होऊनही कर्णधार रोहित शर्माने रचला इतिहास, T- 20 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू..

भारतीय संघाने सामन्यात 158 धावांचे लक्ष्य 17.3 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केले. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना शिवम दुबेने 40 चेंडूत सर्वाधिक 60 धावांची नाबाद खेळी खेळली. आपल्या खेळीदरम्यान शिवम दुबेने 5 चौकार आणि 2 शानदार षटकार ठोकले. हा सामना जिंकून टीम इंडियाने आता मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here