IND vs AFG: अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-20 साठी संघातून 8 मोठे खेळाडू गायब, ‘या’ 10 खेळाडूंना सोबत घेऊन रोहित शर्मा उतरणार मैदानात..

IND vs AFG: अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-20 साठी संघातून 8 मोठे खेळाडू गायब, 'या' 10 खेळाडूंना सोबत घेऊन रोहित शर्मा उतरणार मैदानात..

IND vs AFG:  मायदेशात खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली तब्बल 14 महिन्यांनंतर टी-20 फॉरमॅटमध्ये परतले आहेत. या दोन दिग्गज खेळाडूंशिवाय संजू सॅमसन, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. म्हणजेच अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत हे खेळाडू चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरले तर त्यांना टी-20 विश्वचषकाचे तिकीट मिळू शकते.

मात्र दुसरीकडे या खेळाडूंशिवाय अनेक खेळाडूंचीही निराशा झाली आहे. यातील काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत तर काहींना विश्रांती देण्यात आली आहे, मात्र दोन खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. असे असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय ताफ्यात समाविष्ट नसलेल्या आठ मोठ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

IND vs AFG: दोन्ही संघामधील टी-20 मालिकेला 11 जानेवारी पासून सुरवात, रोहित-विराटची संघात इंट्री, पहा कधी कुठे? खेळवला जाणार पहिला सामना..

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेत हे 8 खेळाडू नसणार .

  • सूर्यकुमार, हार्दिक आणि रुतुराज गायकवाड जखमी 

मधल्या फळीतील भारतीय संघाची शान सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि रुतुराज गायकवाड हे यांच्या दुखापतीमुळे आगामी टी-२० मालिकेचा भाग नाही. आफ्रिकन दौऱ्यात सूर्याच्या पायाला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्या टाचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली होती. या दोन खेळाडूंशिवाय 19 डिसेंबर रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात गायकवाडच्या बोटाला दुखापत झाली होती. सध्या तो दुखापतीतून  सावरत आहे.

 

  • IND vs AFG:  बुमराह, जडेजा आणि राहुल यांना विश्रांती मिळाली आहे.

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांना आगामी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू आफ्रिकन दौऱ्यात सातत्याने सहभागी होत होते. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाने त्याला आगामी मोठ्या सामन्यांपूर्वी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • IND vs AFG: श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना संघात स्थान मिळाले नाही.

श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांचा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय ताफ्यात समावेश करण्यात आलेला नाही. या दोन्ही खेळाडूंमध्ये फिटनेसची कोणतीही समस्या नाही. आफ्रिकन दौऱ्यावर अय्यरही भारतीय संघासोबत होता.

IND vs AFG: अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-20 साठी संघातून 8 मोठे खेळाडू गायब, 'या' 10 खेळाडूंना सोबत घेऊन रोहित शर्मा उतरणार मैदानात..

आगामी मालिकेतून दुर्लक्षित झाल्यानंतर या दोन खेळाडूंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की कदाचित हे दोन खेळाडू आगामी T20 विश्वचषकातील भारतीय योजनांचा भाग नसतील. त्यामुळेच अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून त्याला दुर्लक्षित करण्यात आले आहे.

 

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मुके कुमार. , आवेश खान आणि अर्शदीप सिंग.


हेही वाचा:

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *