IND vs AFG: रोहित-कोहलीच्या येण्याने भारतीय टी-20 संघात मोठे बदल, विश्वचषकासाठी ‘या’ खेळाडूंची होणार हकालपट्टी..

IND vs AFG: रोहित-कोहलीच्या येण्याने भारतीय टी-20 संघात मोठे बदल, विश्वचषकासाठी 'या' खेळाडूंची होणार हकालपट्टी..

IND vs AFG: 14 महिन्यांनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतासाठी टी-20 सामने खेळताना दिसणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक-2022 मध्ये भारताने उपांत्य फेरी गाठली. यानंतर हे दोन्ही खेळाडू T20 मधून ब्रेकवर गेले आणि टीम इंडियासाठी एकही T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आता दोघेही परतले आहेत.

भारताला ११ जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे, त्यासाठी निवडकर्त्यांनी दोघांची संघात निवड केली आहे. पण या दोघांच्या आगमनाने काही खेळाडूंचे नुकसान होऊ शकते आणि प्लेइंग-11 मधील त्यांचे स्थान गमवावे लागू शकते.

IND vs AFG: अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-20 साठी संघातून 8 मोठे खेळाडू गायब, 'या' 10 खेळाडूंना सोबत घेऊन रोहित शर्मा उतरणार मैदानात..

भारताने शेवटची टी-२० मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती जी १-१ अशी बरोबरीत होती. भारताने तिसरा सामना 106 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. त्या सामन्यातील टीम इंडियाच्या प्लेइंग-11 पैकी एक किंवा दोन खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दार दाखवले जाऊ शकते.

IND vs AFG: रोहित- विराटच्या येण्याने संघातून  बाहेर कोण जाणार?

या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे, म्हणजेच तो नक्कीच खेळणार आहे. विराट कोहलीच्या उंचीच्या खेळाडूलाही प्लेइंग-11 मधून वगळता येणार नाही. म्हणजे दोघेही खेळणार हे निश्चित. अशा स्थितीत एका खेळाडूचे बाहेर पडणे निश्चित आहे. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सलामी दिली. या दोघांची अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतही निवड झाली आहे. या दोघांशिवाय रोहितही संघात सलामीला येतो.

रोहितचे खेळणे निश्चित आहे, अशा स्थितीत जैस्वाल किंवा गिल यापैकी एकाचे बाहेर पडणे निश्चित आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादव संघाचा कर्णधार होता पण तो या मालिकेत नाही. त्याच्या जागी कोहलीचा प्लेईंग-11 मध्ये समावेश होणार आहे. तिसर्‍या टी-20 मध्ये तिलक वर्मा नंबर-3 वर खेळला पण कोहलीच्या आगमनानंतर त्याला नंबर-4 वर यावे लागेल.

IND vs AFG: रोहित-कोहलीच्या येण्याने भारतीय टी-20 संघात मोठे बदल, विश्वचषकासाठी 'या' खेळाडूंची होणार हकालपट्टी..

मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा दक्षिण आफ्रिका मालिकेत होते पण या मालिकेत नाहीत. जडेजाच्या जागी ऑफस्पिनर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेलला प्लेइंग-11 मध्ये निवडले जाऊ शकते. सिराजच्या जागी आवेश खानला संधी मिळू शकते.

IND vs AFG: पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाचा संभावित संघ.

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.


हेही वाचा:

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *