IND vs AFG: रोहित शर्माने रचला इतिहास.. महेंद्रसिंग धोनी-बाबर आजमशी बरोबरी करत टी-२० मध्ये केली अशी कामगिरी..!

IND vs AFG: रोहित शर्माने रचला इतिहास.. महेंद्रसिंग धोनी-बाबर आजमशी बरोबरी करत टी-२० मध्ये केली अशी कामगिरी..!

IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांची T20 मालिका संपली आहे. भारताने या मालिकेतील शेवटचा सामनाही जिंकून मालिका 3-0 अशी खिशात घातली आहे. काल झालेल्या शेवटच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऐतिहासिक खेळी केली आहे. रोहितने केवळ एक फलंदाज म्हणून अनेक विक्रम केले नाहीत, याशिवाय रोहितने कर्णधारपदातही चमत्कार केले आहेत. रोहित शर्मा आता T20 फॉरमॅटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. रोहितने कोणते रेकॉर्ड केले तेजाणून घेऊया या बातमीमध्ये अगदी सविस्तर..

IND vs AFG: कर्णधार म्हणून खेळतांना रोहित शर्माने 42 वा सामना जिंकला,ठरला भारतासाठी सर्वाधिक त-२० सामने जिंकणारा कर्णधार..

IND vs AFG: टीम इंडियापुढे इतिहास रचण्याची संधी..! तिसरा टी-२० सामना जिंकल्यास टीम ईंडीया ठरणार अशी कामगिरी करणारा पहिला संघ..

रोहित शर्माने टी-20 मध्ये कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्या विक्रमांची बरोबरी केली आहे. रोहित शर्मा आता भारतासाठी सर्वाधिक T20 सामने जिंकणारा कर्णधार बनला आहे.

माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही एकूण 72 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी एकूण 42 सामने जिंकले, तर एक सामना अनिर्णित राहिला. याशिवाय बाबर आझमनेही आपल्या संघासाठी ४२ सामने जिंकले आहेत. बाबरने 71 सामन्यांमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व केले, त्यापैकी 42 सामने जिंकले. आता रोहित शर्माने भारताला 42 वा सामनाही जिंकून दिला आहे.

विशेष म्हणजे रोहित शर्माने भारतासाठी केवळ 54 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. रोहितने आतापर्यंत एकूण 54 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून त्यापैकी 42 सामने भारताच्या नावावर आहेत. अशा परिस्थितीत रोहितने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

IND vs AFG: रोहित शर्माने रचला इतिहास.. महेंद्रसिंग धोनी-बाबर आजमशी बरोबरी करत टी-२० मध्ये केली अशी कामगिरी..!

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी रोहित शर्मावर टी-20 खेळण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, खुद्द निवडकर्त्यांनाही या खेळाडूला संघात ठेवण्यात फारसा रस दिसत नव्हता. रोहित शर्माची तंदुरुस्ती आणि वय त्याच्यासाठी अडथळे ठरत होते, पण तिसऱ्या सामन्यात रोहितने ज्याप्रकारे कामगिरी केली त्यावरून तो टी-२० विश्वचषक खेळण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट झाले.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *