IND vs AFG: “राग आला होता मात्र…” सामना संपल्यानंतर रणआऊटबद्दल रोहित शर्माने केला मोठा खुलासा, शुभमनला दिला असा सल्ला..!

IND vs AFG: "राग आला होता मात्र..." सामना संपल्यानंतर रणआऊटबद्दल रोहित शर्माने केला मोठा खुलासा, शुभमनला दिला असा सल्ला..!

IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील गुरुवारपासून सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला असेल, पण रोहित शर्माचा राग चाहत्यांमध्ये चर्चेत राहिला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यातील गोंधळामुळे रोहित दुसऱ्याच चेंडूवर खाते न उघडता धावबाद झाला. यानंतर तो खूप संतापलेला दिसत होता. मात्र, सामन्यानंतर त्याने याबाबत मौन सोडले.

IND vs AFG: शून्यावर धावबाद झाल्यानंतर रोहित शर्मा नाराज, सामन्याननंतर केला खुलासा.

सामन्यानंतर रोहित म्हणाला, इथे खूप थंडी होती. जेव्हा चेंडू बोटाच्या टोकाला लागला तेव्हा खूप वेदना झाल्या. रोहित पुढे म्हणाला की, रनआउट्ससारख्या गोष्टी घडत राहतात. जेव्हा हे घडते तेव्हा तुम्ही निराश व्हाल कारण तुम्हाला   तिथे उभे राहून संघासाठी योगदान द्यायचे असते. परंतु या सर्वापेक्षा आम्ही सामना जिंकला आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे.

Viral Video: शून्यावर बाद होताच रोहित शर्माला राग अनावर, भरल्या मैदानात शुभमन गिलला झापले; व्हिडीओ सोशल मिडीयावर होतोय तुफान व्हायरल..

IND vs AFG: शून्यावर बाद होऊनही कर्णधार रोहित शर्माने रचला इतिहास, T- 20 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू..

रोहित शर्मा पुढे बोलतांना म्हणाला,

तरीही सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. आम्ही सामना जिंकला, हे जास्त महत्त्वाचे आहे. रोहित पुढे म्हणाला की, गिलने मोठी खेळी खेळावी  असी माझी इच्छा होती, पण दुर्दैवाने तो छोटी खेळी खेळून बाद झाला.

या सामन्यातून समोर आलेल्या सकारात्मक पैलूंबद्दल रोहित पुढे बोलला. तो म्हणाला, विशेषत: बॉलमधून आम्हाला बर्‍याच सकारात्मक गोष्टी मिळाल्या. आमच्यासमोरची परिस्थिती सोपी नव्हती. असे असूनही, आमच्या फिरकीपटूंनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली आणि आमच्या वेगवान गोलंदाजांनीही चमकदार गोलंदाजी केली. शिवम दुबे आणि जितेश यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यानंतर तिलक आणि रिंकूही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

IND vs AFG: "राग आला होता मात्र..." सामना संपल्यानंतर रणआऊटबद्दल रोहित शर्माने केला मोठा खुलासा, शुभमनला दिला असा सल्ला..!

रोहित पुढे वेगवेगळ्या गोष्टी करून पाहण्याबद्दल बोलला. तो म्हणाला की, वॉशिंग्टन सुंदरने १९ वे षटक टाकले. ज्या भागात आपण थोडे अस्वस्थ आहोत अशा ठिकाणी आपल्याला आव्हान द्यायचे आहे. आम्ही जे काही शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करू, परंतु ते सामन्याच्या खर्चावर होणार नाही.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *