IND vs AFG 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना या मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचा नव्हता, कारण भारताने या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली होती. मात्र, बंगळुरूमध्ये दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याने इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन सुपर ओव्हर खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, एकूणच क्रिकेटमध्ये ही दुसरी वेळ आहे जेव्हा दोन सुपर ओव्हर्स खेळल्यानंतर सामन्याचा विजेता ठरला आहे.
क्रिकेटच्या इतिहासात याआधी डबल सुपर ओव्हरचा सामना झाला आहे.
आयपीएलमध्ये एक सामना होता ज्याचा निर्णय दोन सुपर ओव्हर खेळल्यानंतर झाला. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 13 व्या हंगामात, 18 ऑक्टोबर 2020 रोजी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स चा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी झाला आणि सामना बरोबरीत संपला. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील या सामन्यातील सुपर ओव्हर देखील टाय झाली, कारण पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी 5-5 धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सने दिलेल्या 12 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ विजयी झाला होता.
डबल सुपर ओव्हरचा नियम का आला?
वास्तविक, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक 2019 च्या फायनलच्या विजेत्याचा निर्णय वादात सापडला असताना ICC ने क्रिकेटमध्ये डबल सुपर ओव्हरचा नियम आणला. विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडने त्यांच्या 50 षटकात 241-241 धावा केल्या. यानंतर दोन्ही देशांमध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आली. विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्याची सुपर ओव्हर देखील बरोबरीत संपली, कारण सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी 15-15 धावा केल्या होत्या. मात्र, त्यावेळी क्रिकेटमध्ये दुहेरी सुपर ओव्हरचा कोणताही नियम नसल्यामुळे सामन्याचा निकाल चौकारांच्या गणनेवर लावला जात असे.
न्यूझीलंडच्या हातातून विश्वचषक ट्रॉफी निसटली होती.
चौकार मोजण्याच्या आधारावर, इंग्लंड संघाला विश्वचषक 2019 चा विजेता घोषित करण्यात आला आणि न्यूझीलंडच्या हातून विश्वचषक ट्रॉफी निसटली. आयसीसीच्या या निर्णयानंतर बॉनड्री मोजणीच्या नियमावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर आयसीसीला नियम बदलणे भाग पडले.आणि त्यांनतर आयसीसीने हा नियम बदलून निर्णय येईपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्याचा नियम जाहीर केला.
आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, सामना बरोबरीत राहिल्यास सामन्याचा निर्णय होईपर्यंत सुपर ओव्हर घेण्यात येईल. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करून दुसऱ्या सुपर ओव्हरचा थरार गाठला आणि तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…