IND vs AUS: केवळ 117 धावांत बाद झाला संपूर्ण संघ , 10 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय, टिम इंडियाच्या नावावर झाले हे 3 नकोसे विक्रम..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघ 117 धावांवर गारद झाला. अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट झालेल्या टीम इंडियाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. भारताची घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात लहान धावसंख्या आहे. त्याच वेळी, एकदिवसीय प्रकारात भारताची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत भारताची सर्वात कमी धावसंख्या

63, सिडनी, 1981
100, सिडनी, 2000
117, विशाखापट्टणम, आज
125, सेंच्युरियन, 2003
145, मेलबर्न, 1992
1981 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया 63 धावांत गारद झाली होती. या दोन्ही संघांमधील सामन्यातील टीम इंडियाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यानंतर 2000 मध्ये सिडनीमध्येच भारत 100 धावांत ऑलआऊट झाला होता.
मायदेशात भारताची वनडेतील सर्वात कमी धावसंख्या
78 विरुद्ध श्रीलंका, कानपूर, 1986
100 वि वेस्ट इंडीज, अहमदाबाद, 1993
112, विरुद्ध श्रीलंका, धर्मशाला, 2017
117 वि ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टणम, आज
135 विरुद्ध वेस्ट इंडिज, गुवाहाटी, 1987
Ab to aadat si ho gyi hai 10 wickets se harne ki#INDvsAUS pic.twitter.com/XqAx4aUllQ
— im_rvndr_meena (@im_rvndr_meena) March 19, 2023
जर आपण घरच्या मैदानाबद्दल बोललो, तर भारताने आज सर्व संघांविरुद्ध चौथ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या नोंदवली आहे. 1986 मध्ये भारताने कानपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक 78 धावा केल्या होत्या. यानंतर 1993 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबादमध्ये भारतीय संघ 100 धावांवर बाद झाला. त्यानंतर 2017 मध्ये टीम इंडियाने धर्मशालामध्ये श्रीलंकेविरुद्ध 112 धावा केल्या होत्या. आता 117 धावांचा विक्रम ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या सर्वात कमी धावांचा आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी वनडे
Virat Kohli 🤝 Nitin Menon 🤝 LBW.
What a story this has been, Nitin menon don't even think twice when Kohli is infront of him 🥲#INDvsAUS pic.twitter.com/ZrVEycTOPD
— Akshat (@AkshatOM10) March 19, 2023
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर भारतीय संघाच्या पाच विकेट अवघ्या 49 धावांत पडल्या होत्या. यानंतर संपूर्ण संघ पत्त्यासारखा विखुरला आणि केवळ 117 धावाच करू शकला. भारताकडून विराट कोहलीने 31, तर अक्षर पटेलने 29 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 118 धावा कराव्या लागतील.
हेही वाचा:
2023 चा वर्ल्डकप जिंकून मी निवृत्ती घेणार- इंग्लंडच्या या स्टार खेळाडूने केला मोठा खुलासा..
ऐन वर्ल्डकप मध्ये रिषभ पंत बनला संगीतकार, क्रिकेट सोडून आता करतोय ही कामे..
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..