IND vs AUS 2nd Test Playing 11: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रोलिया दौऱ्यावर आहे जिथे बोर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे .
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे खेळवला जाणार आहे. हा दिवस-रात्र सामना पिंक बॉलने (Pink Ball Test) खेळवला जाईल.
या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (ind vs aus 2nd test playing 11) बदल होणार आहेत. रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर चाहत्यांच्या नजरा आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर खिळल्या आहेत. ॲडलेड कसोटीबाबत टीम इंडियाच्या अंतिम 11 (Team india playing 11) मध्ये काही मोठे बदल होऊ शकतात..
IND vs AUS 2nd Test Playing 11: प्लेईंग 11 मध्ये रोहित शर्मा – शुभमन गिल दोघांचेही होऊ शकते पुनरागमन..
टीम इंडियाचा पूर्णवेळ कसोटी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल पर्थ कसोटीत खेळले नव्हते, मात्र आता हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी परतले आहेत.
रोहित शर्मा पुन्हा टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणार आहे, पण हिटमॅन कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल, हा मोठा प्रश्न आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल सलामीला फलंदाजी करताना दिसला होता.
याशिवाय शुभमन गिल आता इंजरीमधून पूर्णपणे बरा झाला आहे. त्याने PM 11 विरुद्ध सराव सामन्यात भाग घेऊन अर्धशतक देखील झळकावले होते त्यामुळे या दुसऱ्या सामन्यात त्याची जागा पक्की झाली आहे. शुभमन पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे.
IND vs AUS 2nd Test Playing 11: जडेजा, अश्विन की सुंदरमधून फिरकीपटू म्हणून कोणाला संधी मिळणार?
पर्थच्या वेगवान खेळपट्टीचा विचार करता टीम इंडिया पहिल्या सामन्यात केवळ एकच फिरकीपटू घेऊन मैदानात उतरली होती. त्या सामन्यात रवींद्र जडेजा आणि आर अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदर खेळताना दिसला होता.
त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला ॲडलेड कसोटीतही संधी मिळणार की ? रवींद्र जडेजा आणि अश्विन यापैकी कोणीतरी पुनरागमन करणार ?हा सर्वांत महत्वाचा विषय असणार आहे. कारण ॲडलेड च्या ओव्हल मैदानाची खेळपट्टी (Oval, Adelaide pitch) ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरू शकते,असा पीच रिपोर्ट समोर येत आहे.
ॲडलेड कसोटीत भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Team ndia 2nd test playing 11)
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.
क्रिकेटच्या ताज्या घडामोडी वाचा तुमच्या मोबाईलवर आतच फॉलो करा: YuvakattaSports