IND vs AUS : उद्यापासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात होऊ शकतात हे मोठे बदल, हा सामनावीर फलंदाज होऊ शकतो बाहेर,अशी असू शकते अंतिम 11 खेळाडूंची टीम इंडिया…
IND vs AUS : उद्यापासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात होऊ शकतात हे मोठे बदल, हा सामनावीर फलंदाज होऊ शकतो बाहेर,अशी असू शकते अंतिम 11 खेळाडूंची टीम इंडिया…
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होईल तर नाणेफेक सकाळी 9 वाजता होईल. या मालिकेत टीम इंडिया आधीच 1-0 ने आघाडीवर आहे.
अशा स्थितीत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाला दुसरी कसोटीही जिंकून मालिकेत आघाडी मिळवायची आहे. यासाठी कर्णधार रोहित प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल करू शकतो. भारताने नागपूर कसोटी एक डाव आणि १३२ धावांनी जिंकली होती. आजच्या या लेखात आपण टीम इंडियातील संभावित बदलांविषयी जाणून घेणार आहोत.
View this post on Instagram
1.सलामी जोडीमध्ये बदल होण्याची शक्यता..
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे तर, या सामन्यात टीम इंडियाच्या सलामीवीर जोडीमध्ये बदल होऊ शकतो. पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुल कर्णधार रोहितचा जोडीदार बनला पण तो काही विशेष अशी कामगिरी करून दाखवू शकला नाही. राहुलला या कसोटीत केवळ 20 धावा करता आल्या अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी देईल याची शक्यता वाटत नसली तरीसुद्धा संघाच्या उपकर्णधाराला संघातून बाहेर करण्याचा निर्णय घेने रोहितसाठी सुद्धा वाटतंय तेवढ सोपं नाहीये. म्हणूनच राहुल हा सामना खेळेल का नाही? यात थोडी शंका आहेच.
कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्या कसोटी सामन्यात 120 धावांची शतकी खेळी केली. त्याचवेळी, कसोटी सामन्यात शतकवीर रोहित सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला त्याचा जोडीदार म्हणून संधी देऊ शकतो. त्याने नुकतेच टी-20 मध्ये पहिले शतक झळकावले आहे तर एकदिवसीय सामन्यातही त्याने द्विशतक झळकावले आहे. वरील सर्व बाबीकडे लक्ष देता शुभमन सलामीवीर म्हणून रोहित सोबत मैदानात उतरल्यास आच्छर्य वाटायला नको..

2. मधल्या फळीमध्ये बदलांची अपेक्षा नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलताना, चेतेश्वर पुजारा मधल्या फळीत 3 व्या क्रमांकावर खेळताना दिसेल. पुजाराला पहिल्या कसोटीत केवळ 7 धावा करता आल्या होत्या, तर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली असेल, जो नागपूर कसोटीत अवघ्या 12 धावांवर बाद झाला होता. अशा स्थितीत या दोन्ही फलंदाजांना दिल्ली कसोटीत पुनरागमन करायला आवडेल.
त्याचवेळी, सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) आणखी एक संधी मिळू शकते, जो पहिल्या कसोटीत केवळ 8 धावा करू शकला होता, तर सहाव्या क्रमांकावर असलेल्या इशान किशनला यष्टिरक्षक म्हणून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. केएस भरतला पहिल्या कसोटीत केवळ 8 धावा करता आल्या.
3. अष्टपैलू खेळाडूंची कामगिरीसरस असल्यामुळे त्यात बदल अशक्य..
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे तर, पहिल्या कसोटीत अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे अष्टपैलूंच्या त्रिकुटात कोणताही बदल होईल असं दिसत नाही. नागपूर कसोटीत जडेजाने 70 धावा देत 7 बळी घेतले होते. अश्विनने 9 विकेट्ससह 23 धावा केल्या तर अक्षर पटेलने 84 धावांसह 1 बळी मिळवला.
त्याचबरोबर शमी-सिराज वेगवान गोलंदाजीत खेळतील याची खात्री आहे. पहिल्या शमीने 3 तर सिराजने 1 बळी घेतला.
दुसऱ्या कसोटीसाठी अशी असू शकते भारताची संभावित अंतिम 11 खेळाडूंची टीम.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
हे ही वाचा..
दुसऱ्या कसोटीतही श्रेयस अय्यर संघाबाहेर? वाचा काय म्हणाले हेड कोच राहुल द्रविड…
पाकिस्तानने १९९२ चा WC केव्हा जिंकला होता? अभिनेत्रीने दिलेले उत्तर पाहून हसून हसून व्हाल लोटपोट..