क्रीडा

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रोलीयाच्या दुसऱ्या कसोटीनंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याचे संकेत, हे 3 स्टार खेळाडू होणार संघातून बाहेर तर बूमराह थेट आयपीएलमध्येच उतरणार मैदानात..

भारत आणि ऑस्ट्रोलीयाच्या दुसऱ्या कसोटीनंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याचे संकेत, हे 3 स्टार खेळाडू होणार संघातून बाहेर तर बूमराह थेट आयपीएलमध्येच उतरणार मैदानात..


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला नागपुरातील पहिल्या सामन्याने सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. भारताला ही मालिका ३-० ने जिंकायची आहे. असे झाले नाही तर भारताचा WTC प्रवास संपुष्टात येईल. बीसीसीआयने मालिका सुरू होण्यापूर्वी या मालिकेतील 2 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती.

मात्र, शेवटच्या दोन सामन्यांचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआय लवकरच शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी १७ सदस्यीय संघ जाहीर करू शकते. त्याचवेळी, सूर्यकुमार गेल्या दोन सामन्यांत संघाबाहेर जाणार असून त्याच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलग शतके झळकावणारा मधल्या फळीतील खेळाडू सर्फराज खानला संधी मिळू शकते. यासोबतच संघात अनेक बदलही पाहायला मिळतात. या लेखाद्वारे 17 सदस्यीय संघावर एक नजर टाकूया.

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

सरफराजला संधी मिळू शकते!

पहिला सामना जिंकून भारतीय क्रिकेट संघ दिल्लीला रवाना झाला आहे. दुसरा कसोटी सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला आघाडी कायम ठेवायची आहे. हाच ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत १-१ अशी बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाला कोणतीही चूक करायची नाही.

संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमारने पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण सामना खेळला. ज्यामध्ये तो आपल्या बॅटने धावा करू शकला नाही. या सामन्यात त्याने केवळ 8 धावा केल्या आहेत. दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने विरोधी गोलंदाजांना सतत मात देणाऱ्या सरफराज खानला पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघात स्थान मिळवता आलेले नाही. पण, बीसीसीआय तिसर्‍या आणि चौथ्या सामन्यासाठी सरफराज खानला १७ सदस्यीय संघाचा भाग बनवू शकते. त्याचा शेवटचा रणजी हंगाम शानदार होता. ज्यामुळे तो संघात स्थान मिळवू शकतो.

केएल राहुल आणि सूर्यकुमार यांना मिळू शकतो डच्चू..!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारतीय कसोटी संघात केएल राहुलच्या जागी हे तीन खेळाडू कसोटी संघातून केएल राहुलचे पान कापले जाऊ शकते, हे तीन खेळाडू जागा घेण्यासाठी बसले आहेत.

सध्या केएल राहुलचा फॉर्महा कुणालाही आवडणारा नाहीये. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तो त्याच्या बॅटने धावा करू शकत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही त्याने खराब कामगिरी कायम ठेवली. कर्णधार रोहित शर्माने फॉर्मात असलेल्या गिलला संधी न देता त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवले. पण, या सामन्यात तो केवळ 20 धावा करू शकला आणि टॉड मर्फीच्या हाती सोपा झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

कसोटी

त्याच्या जागी सौराष्ट्रविरुद्धच्या उपांत्य फेरीत द्विशतक झळकावणाऱ्या सलामीवीर मयंक अग्रवालचा संघात समावेश केला जाऊ शकतो. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 249 धावांची स्फोटक खेळी केली. आणि दुसऱ्या डावात 55 धावा करून तो बाद झाला. त्याने यंदाचा रणजी हंगाम अप्रतिम गाजवला. त्यामुळे तो टीम इंडियामध्ये स्थान घेण्यास पात्र आहे.

असा असू शकतो टीम इंडियाचा 17 सदस्यीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), सरफराज खान, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट


हेही वाचा:

VIRAL VIDEO: मोहम्मद शमीने टाकला एवढा जबरदस्त योर्कर की, स्टंप उडून पडले लांब पाहून नाथन लायनचे उडाले होश, व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..

या 5 गोलंदाजांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त ‘नो बॉल’ फेकलेत..

पुरुषी वर्चस्वाच्या काळात विज्ञानासह भौतिक शास्त्रातसुद्धा सुद्धा या ‘महिला शास्त्रज्ञाने’ आपल्या कामगिरीने महिलांना आदर मिळवून दिला होता..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,