Ind vs Aus 3rd ODI: रोहित-विराट परतणार तर हे ३ खेळाडू संघातून होणार बाहेर, अंतिम वनडेसाठी असी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग 11
राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या वनडेमध्ये (Ind vs Aus 3rd ODI) भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल निश्चित आहेत. तिसऱ्या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव टीम इंडियात परतणार आहेत. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. आता तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. राजकोट एकदिवसीय सामन्यात भारताचे प्लेइंग इलेव्हन कसे असू शकतात ते जाणून घेऊया.
असी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन
नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सलामीवीर म्हणून पुनरागमन करेल. तर शेवटच्या सामन्यातील सलामीवीर शुभमन गिलला (Shubhman gill) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय त्याचा सहकारी सलामीवीर रुतुराज गायकवाड हा देखील आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे तिसऱ्या वनडेचा भाग नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मासोबत ईशान किशन ओपनिंगमध्ये दिसू शकतो. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येणे निश्चित आहे.
श्रेयस अय्यर मधल्या फळीत फलंदाजी करणार .
अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल पाचव्या क्रमांकावर येऊ शकतो. सहाव्या क्रमांकावरून सूर्यकुमार यादवला हटवले जाऊ शकते. गेल्या दोन वनडेत अर्धशतके झळकावणाऱ्या सूर्याच्या जागी अष्टपैलू हार्दिक पांड्याला खेळवण्यात येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यानंतर फिरकीपटू रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर दिसू शकतो.

गोलंदाजी विभागाची सुरुवात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवकडून होऊ शकते, जो अश्विनची जागा घेऊ शकतो. शार्दुल ठाकूरलाही तिसऱ्या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाजीमध्ये दिसू शकतात. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये सिराज प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (ind vs aus probable playing 11)
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..