Ind vs Aus: आज शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रोलियाचा पराभव झाल्यास सर्वांत मोठा नकोसा विक्रम होईल त्यांच्या नावावर,2020 नंतर पहिल्यांदाच घडतंय असे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी (२७ सप्टेंबर) राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरू होईल. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावून मालिका आधीच गमावली आहे. जर कांगारूंचा संघ तिसरा एकदिवसीय सामना हरला तर त्यांच्या नावावर एक अतिशय लज्जास्पद विक्रम नोंदवला जाईल. खरे तर आज ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला तर ते सलग 6 वनडे गमावतील. आणि क्रिकेटच्या इतिहासात सलग 6सामने गमावण्याचा लज्जास्पद विक्रम पुन्हा ऑस्ट्रोलियाच्या नावावर होईल.
2020 मध्ये ऑस्ट्रोलियाने गमावले होते सलग 5 एकदिवशीय सामने.

2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सलग 5 एकदिवसीय सामने गमावले आहेत. 2020 मध्येही संघ सलग पाच एकदिवसीय सामने हरला होता. मात्र, जेव्हा (2020) त्याने सहावा एकदिवसीय सामना जिंकला. आता ऑस्ट्रेलियाला आजही सहावा वनडे जिंकता येतो की राजकोट वनडे हरवून लाजिरवाणा विक्रम करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 2020 मध्येही, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध सलग पाच सामने गमावले होते आणि यावेळीही संघ दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध सलग पाच सामने हरला आहे.
मात्र, 2020 मध्ये सहाव्या सामन्यात कांगारू संघाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला. पण आता 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध सहावा सामना खेळायचा आहे. अशा स्थितीत सलग पाच सामने गमावल्यानंतरही सहावा विजय मिळवणे त्यांच्यासाठी सोपे नसेल. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडिया उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: तिसऱ्या सामन्यात परतणार कर्णधार रोहित शर्मा!
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये केएल राहुलने नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची कमान सांभाळली होती. मात्र आता तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माचे पुनरागमन होणार असून तो भारताचे कर्णधारपद सांभाळणार आहे. रोहित शर्माशिवाय विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवही तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करतील.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..