IND vs AUS 3RD Test Live: इंदोरच्या मैदानावर आजपासून भिडणार भारत आणि ऑस्ट्रोलिया, तिसऱ्या कसोटीमध्ये असे असू शकतात दोन्ही संघ, जाणून घ्या पीच रिपोर्ट..
सध्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धा सुरू आहे.
ट्रॉफीचे पहिले दोन सामने खेळले गेले आहेत.भारतीय संघाने हे दोन्ही सामने जिंकत आतापर्यंत सिरीजवर वर्चस्व गाजवले आहे. आणि या दोन सामन्यांनंतर दोन्ही संघांना तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीसाठी बराच वेळ मिळाला. आता ती वेळ हळूहळू संपुष्टात आली असून १ मार्चपासून म्हणजेच आजपासून दोन्ही संघ पुन्हा एकदा इंदोरच्या मैदानावर तिसऱ्या कसोटीमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत.
मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांच्या नजरा इंदूरच्या खेळपट्टीवर खिळल्या आहेत. तिसर्या कसोटी सामन्यासाठी इंदूरची खेळपट्टी दोन्ही संघांसोबत कशी असूशकते, गोलंदाजांसाठी ती योग्य आहे की फलंदाजांसाठी चांगली आहे? याबद्दल प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा आहे. चला तर जाणून घेऊया इंदोरच्या मैदानाचा पीच रिपोर्ट..

उभय संघांमधला तिसरा कसोटी सामना मध्य प्रदेशातील इंदूर येथील होळकर स्टेडियमवर होणार नव्हता, मात्र धर्मशाला येथील खराब परिस्थिती लक्षात घेऊन बीसीसीआयने हा सामना इंदोरमध्ये शिफ्ट केला आहे. या खेळपट्टीवर आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने आयोजित करण्यात आले आहेत.
जिथे भारतीय संघाने एक सामना जिंकला आहे. इंदूरच्या खेळपट्टीवर लाल माती आहे. लाल मातीच्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
सामन्याच्या पहिल्या 2 दिवसात खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप अनुकूल असते आणि येथे प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी खेळी करू शकतो. इंदूरच्या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 353 आहे तर चौथ्या डावात शाळेची 150 च्या आसपास आहे. अशा परिस्थितीत, या सामन्यात जो संघ नाणेफेक जिंकेल, तो प्रथम फलंदाजी करू शकतो.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
इंदूर कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग 11:
पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, टॉड मर्फी.
विशेष म्हणजे, चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये यजमान संघाने पाहुण्या संघाला पराभूत केले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला तर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सच्या फरकाने पराभव केला.
आता तिसऱ्या कसोटीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे पारडे जड भरते की विरोधी संघाचे गोलंदाज त्यांच्यावर भारी पडतात, हे काही तासात आपल्याला कळेलच..भारतीय वेळेनुसार सकाळी 9वाजता नाणेफेक होईल आणि 9:30 वाजता सामना सुरु होईल.
हे ही वाचा..
रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..