भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत २-० ची आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला आहे. मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला होता. तर दिल्ली कसोटीत भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता. तिसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल,चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया :
उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पिटर हँड्सकाँब, कॅमरन ग्रीन, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुन्हेमन