IND vs AUS: शेवटच्या टी-२० मध्ये कर्णधार ‘सूर्यकुमार यादव’ रचू शकतो मोठा इतिहास, विराट कोहलीला मागे सोडत असं करणारा बनू शकतो पहिला कर्णधार..

IND vs AUS: शेवटच्या टी-२० मध्ये कर्णधार 'सूर्यकुमार यादव' रचू शकतो मोठा इतिहास, विराट कोहलीला मागे सोडत असं करणारा बनू शकतो पहिला कर्णधार..

IND vs AUS: भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या चारपैकी तीन सामने जिंकून मालिकेत आधीच अभेद्य आघाडी घेतली आहे. आता कर्णधार सूर्यकुमार यादवही शेवटच्या टी-20 सामन्यात फलंदाजीने मोठा चमत्कार घडवू शकतो.

सूर्यकुमार यादवने प्रथमच भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारून आतापर्यंत स्वतःला पूर्णपणे सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारला कर्णधारपद देण्यात आले होते. या मालिकेतील पहिल्या चारपैकी तीन सामने जिंकून टीम इंडियाने मालिका आधीच जिंकली आहे.

IND vs AUS : श्रेयस अय्यरचे पुनरागमन तर उपकर्णधारही बदलला जाणार, चौथ्या TI- सामन्यासाठी असा असू शकतो भारतीय संघ..

आता शेवटच्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादव बॅटने मोठा चमत्कार घडवू शकतो, ज्यामध्ये तो अनुभवी भारतीय खेळाडू विराट कोहलीचा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

IND vs AUS:  या बाबतीत सूर्या होऊ शकतो सर्वात वेगवान भारतीय खेळाडू.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 80 धावांची शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर सूर्याने दुसऱ्या सामन्यात 19 आणि तिसऱ्या सामन्यात 39 धावा केल्या. मात्र, चौथ्या सामन्यात तो केवळ एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.

IND vs AUS: शेवटच्या टी-२० मध्ये कर्णधार 'सूर्यकुमार यादव' रचू शकतो मोठा इतिहास, विराट कोहलीला मागे सोडत असं करणारा बनू शकतो पहिला कर्णधार..

आता सर्व चाहत्यांना आशा आहे की ,भारताच्या या मालिकेतील विजयानंतर कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादववरील बरेच दडपण कमी होईल. त्यामुळे त्याच्या बॅटमधून मोठी खेळी पाहायला मिळते. जर सूर्याने शेवटच्या T20 सामन्यात 20 धावा केल्या तर तो T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात कमी डावात 2000 धावांचा टप्पा पार करणारा भारताचा फलंदाज बनेल. या बाबतीत सूर्या विराट कोहलीला मागे टाकेल ज्याने ५६ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. सध्या सूर्यकुमार यादवच्या नावावर 54 डावांमध्ये 1980 धावा आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सूर्यकुमार टी-२० मध्येही संघाचे नेतृत्व करणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना व्हायचे आहे. 10 डिसेंबरपासून येथे तीन सामन्यांची टी-20 (IND vs SA ) मालिका खेळवली जाणार आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.

IND vs AUS: शेवटच्या टी-२० मध्ये कर्णधार 'सूर्यकुमार यादव' रचू शकतो मोठा इतिहास, विराट कोहलीला मागे सोडत असं करणारा बनू शकतो पहिला कर्णधार..

नियमित कर्णधार रोहित शर्मा कसोटी मालिकेत थेट पुनरागमन करणार आहे, तर हार्दिक पंड्या अद्याप अनफिट असल्यामुळे संघाबाहेर आहे. या टी-20 मालिकेतही निवडकर्त्यांनी युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे, ज्यामध्ये मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर हे वरिष्ठ खेळाडू म्हणून उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *