IND vs AUS : अंतिम सामन्यासाठी टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल, तर चिन्नास्वामीचे वातावरणही राहणार ढगाळ; पहा दोन्ही संघांची प्लेईंग 11

IND vs AUS : अंतिम सामन्यासाठी टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल, तर चिन्नास्वामीचे वातावरणही राहणार ढगाळ, पहा दोन्ही संघांची प्लेईंग 11

IND vs AUS:  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 5 T20 सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज म्हणजेच 3 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. भारताने आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 3 सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे.

अशा परिस्थितीत मालिकेच्या दृष्टिकोनातून आजचा सामना फारसा महत्त्वाचा नाही, पण तरीही भारताला 5 सामन्यांची मालिका विजयासह संपवायची आहे. क्रिकेट चाहत्यांच्या इच्छा आज पूर्ण होऊ शकतील का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

IND vs AUS: अक्षर पटेलने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय गोलंदाज.

याआधी मात्र बेंगळूरूमधील हवामानाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. उभय संघामधील अंतिम सामन्यावर सध्या रद्द होण्याची टांगती तलवार आहे.. त्यामागे कारण नक्की काय आहे जाणून घेऊया सविस्तर..

IND vs AUS: अंतिम सामन्यादरम्यान  हवामान ढगाळ राहील.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील मालिकेतील पाचवा सामना आज संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी करत सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्याचा विक्रमही केला आहे. आजच्या सामन्यात दव घटक दिसणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

सायंकाळनंतरही आकाश ढगाळ राहील. मात्र, घाबरण्याची गरज नाही, कारण आकाशात ढग असले तरी पावसाची शक्यता नगण्य आहे, त्यामुळे चाहत्यांच्या उत्साहाला विरजण पडणार नाही, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

IND vs AUS: जितेश शर्मावर चाहत्यांची नजर असेल.

IND vs AUS : अंतिम सामन्यासाठी टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल, तर चिन्नास्वामीचे वातावरणही राहणार ढगाळ, पहा दोन्ही संघांची प्लेईंग 11

हवामान खात्याने सांगितले की, आज बेंगळुरूचे कमाल तापमान 22 अंशांच्या आसपास असणार आहे. चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे की आज त्यांना 40 षटकांचा पूर्ण सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.

या सामन्यात चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा मागील सामन्यातील हिरो ठरलेल्या रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांच्यावर असतील. जितेश शर्माने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच सिद्ध केले होते की त्याच्यातही टीम इंडियात खेळण्याची क्षमता आहे. जितेशने अवघ्या 19 चेंडूंत 35 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यात 1 चौकार आणि 3 षटकारांचाही समावेश होता.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *