IND vs AUS: अक्षर पटेलने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय गोलंदाज.

IND vs AUS: अक्षर पटेलने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय गोलंदाज.

IND vs AUS 4 था T20I सामना: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना रायपूर येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 20 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली. फिरकीपटू अक्षर पटेलने भारतीय संघाला हा सामना आणि मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.

India vs Australia 4th T20I: सामना जिंकून सूर्याने रचला इतिहास, कर्णधार म्हणून खेळतांना केला असा विक्रम..

IND vs AUS: अक्षर पटेलने हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने चौथ्या T20 सामन्यात 4 षटकात केवळ 16 धावा देत 3 बळी घेतले. या तीन विकेट्ससह अक्षर पटेल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. आता या यादीत फक्त जसप्रीत बुमराह त्याच्या पुढे आहे. अक्षर पटेलने T20I मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 7 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर बुमराहच्या नावावर 16 विकेट आहेत. या यादीत अॅडम झाम्पा १२ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.

IND vs AUS:सामना जिंकल्यानंतर अक्षरचे मोठे वक्तव्य

सामन्यानंतरच्या सादरीकरणात अक्षर म्हणाला की, पहिल्याच सामन्यापासून मी चांगली गोलंदाजी करत आहे. अशा परिस्थितीत एक-दोन षटकांत खूप धावा दिल्या गेल्या तर ,मी ताण घेत नाही. मी फक्त माझ्या ताकदीने गोलंदाजी कशी करायची याचा विचार करत होतो. मी मानसिकदृष्ट्या खंबीर राहिलो आणि स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत राहिलो. मी घरी असताना खूप प्रयत्न करत होतो आणि आज सर्व काही ठीक झाले. मी माझ्या ताकदीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला.

IND vs AUS:असा झाला चौथा टी-२० सामना.

IND vs AUS: अक्षर पटेलने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय गोलंदाज.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताकडून जैस्वालने ३७ धावांची खेळी केली, तर गायकवाडने ३२ धावा केल्या. यानंतर रिंकूने 29 चेंडूत 46 धावांची तर जितेश शर्माने 19 चेंडूत 35 धावांची खेळी केली.

१७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाची सुरुवात ट्रॅव्हिस हेड आणि जोश फिलिप यांनी केली, या दोघांनी मिळून पहिल्या ३ षटकात ४० धावा जोडल्या. पण ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकांत 7 विकेट गमावून 154 धावांपर्यंतच मजल मारता आली. अक्षरशिवाय दीपक चहरने 2 तर रवी बिश्नोई आणि आवेश खानने प्रत्येकी 1 बळी घेतला.


हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *