IND vs AUS LIVE: सहज जिंकत असलेला सामना रोहित-द्रविडच्या या मोठ्या चुकीमुळे गमवावा लागला, तिसर्या वनडेत टिम इंडियाचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने मालिकाही घातली खिशात..
IND vs AUS LIVE: सहज जिंकत असलेला सामना रोहित-द्रविडच्या या मोठ्या चुकीमुळे गमवावा लागला, तिसर्या वनडे सह ऑस्ट्रेलियाने मालिकाही घातली खिशात..
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) एकदिवसीय मालिका समाप्त झाली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 22 मार्च रोजी झाला होता. ज्यासाठी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या कांगारू संघाने 49 षटकांत 270 धावांचे लक्ष्य ठेवले. याला प्रत्युत्तर म्हणून यजमानांचा डाव मधल्या षटकांमध्ये गडगडला. भारताने निर्धारित ५० षटकांमध्ये फक्त 248 धावा केल्या आणि लक्ष्यापासून २१ धावा कमी पडल्या. यासह ऑस्ट्रेलियाने मालिका 2-1 अशी खिशात घातली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतरही संघाला पूर्ण ५० षटके खेळता आली नाहीत आणि ४९ षटकांत २६९ धावा केल्या. सलामी जोडी ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांच्यात धावांची अर्धशतकी भागीदारी झाली.

त्यापैकी ३३ धावांचे योगदान हेडचे होते. त्याचवेळी मार्शला 47 चेंडूत 47 धावा करण्यात यश आले. मधल्या फळीत डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅबुशेन आणि अॅलेक्स कॅरी यांनी अनुक्रमे २३, २८ आणि ३८ धावा केल्या.
दुसरिकडे हार्दिक पांड्याच्या चेंडूवर कर्णधार स्टीव्ह स्मिथ खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्कस स्टॉइनिसने 25 आणि शॉन अॅबॉटने 26 धावा केल्या. 17 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर अॅश्टन अगरला मोहम्मद सिराजने बाद केले. मिचेल स्टार्क आणि अॅडम झाम्पाच्या बॅटमधून 10-10 धावा आल्या. दुसरीकडे भारताकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने ३-३ बळी घेतले. सिराज आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. शमी आणि जडेजा यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनीही भारतीय संघाच्या डावाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. पण शॉन अॅबॉटने 30 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर हिटमॅनला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली.
Australia won the ODI series 2-1 with a decisive victory in Chennai#INDvsAUS #INDvsAUS3rdodi #CricketTwitter @CricketAus @ICC @BCCI @TwitterSports pic.twitter.com/FmzYXyWGbu
— Nawaz Gohar (@nawazgohar1) March 22, 2023
शुभमन गिलही ३२ धावांचे योगदान देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुल (32) आणि हार्दिक पंड्या (40) अॅडम झम्पाने बाद केले. या मालिकेत सूर्यकुमार यादव तिसऱ्यांदा गोल्डन डकवर आऊट झाला. अक्षर पटेल 2 धावांवर स्टीव्ह स्मिथने धावबाद झाला. टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली होता, ज्याने 54 धावा करत अर्धशतक झळकावले. रवींद्र जडेजाने केवळ 18 धावा केल्या.
रोहित-द्रविडच्या या एका चुकीने भारताला गमवावा लागला सामना..
तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाची अनेक कारणे होती, पण मुख्य कारण होते संघाची फलंदाजी. कारण या सामन्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी फलंदाजीचा क्रम पूर्णपणे बदलला. वास्तविक, त्याने अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. तो आतापर्यंत खालच्या क्रमाने धावा गोळा करताना दिसला आहे. याशिवाय त्याने सूर्यकुमार यादवला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरवले ज्यामुळे फलंदाजांची लय खराब झाली आणि ते लौकिकाला साजेशी खेळी करू शकले नाही.