IND vs AUS- CWC FINAL: भारताला ट्रॉफी जिंकायची असेल तर, ऑस्ट्रोलियाच्या या 2 खेळाडूंची करावी लागेल बोलती बंद; अन्यथा एकहाती घेऊन जाऊ शकतात विश्वचषक..

IND vs AUS- CWC FINAL:  रविवारी विश्वचषक 2023 चा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ सध्या अहमदाबाद येथे  पोहचले असून आज सराव सुद्धा करतील . दोन्ही संघातील सदस्यांनी तयारी सुरु केली असली तरी देखील संघात काही असेही खेळाडू आहेत, ज्यांच्या कामगिरीने त्यांनी विरोधी संघातील सदस्यांना टेन्शन मध्ये टाकले आहे.

टीम इंडियाच्या बाजूने विचार करायचा झाला तर, विश्वचषक 2023  (World Cup 2023) च्या अंतिम सामन्यात ज्या दोन खेळाडूंविरुद्ध टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशेष रणनीती बनवावी लागेल ते आहेत मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल.  भारताविरुद्ध या दोन खेळाडूंची कामगिरी धक्कादायक ठरली आहे. एक फलंदाजी सरासरीमध्ये सर्वोत्तम आहे आणि दुसरा स्ट्राइक रेटच्या बाबतीत अव्वल आहे.

IND vs AUS, World Cup Final: पावसामुळे नाही झाला अंतिम सामना तर कोण होईल विजेता? जाणून घ्या आयसीसीचे नवे नियम..

यासह, हे दोन खेळाडू आहेत ज्यांनी या विश्वचषकात दोन सर्वात मोठ्या खेळी खेळल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत 201 धावांची नाबाद खेळी खेळली होती. तर मिचेल मार्शने १७७ धावांची नाबाद खेळी केली.

भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यातील चौथी सर्वोत्तम फलंदाजी सरासरी

मिचेल मार्शने टीम इंडियाविरुद्ध ६५.४२ च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीने धावा केल्या. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे इतिहासातील सर्वोच्च फलंदाजीच्या सरासरीच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. या प्रकरणात, विश्वचषक 2023 फायनलमध्ये सहभागी होणारा एकही फलंदाज त्याच्या जवळपासही नाही. त्याच्यानंतर रोहित शर्माचा क्रमांक लागतो, ज्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची फलंदाजीची सरासरी ५८.३० आहे.

मिचेल मार्शने टीम इंडियाविरुद्धच्या 11 वनडे सामन्यांच्या 10 डावांमध्ये आतापर्यंत 458 धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकेही झळकावली आहेत. भारताविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेटही उत्कृष्ट आहे. तो 116 च्या स्ट्राइक रेटने धावा करतो.

IND vs AUS- CWC FINAL: भारताला ट्रॉफी जिंकायची असेल तर, ऑस्ट्रोलियाच्या या 2 खेळाडूंची करावी लागेल बोलती बंद; अन्यथा एकहाती घेऊन जाऊ शकतात विश्वचषक..

भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात मजबूत स्ट्राइक रेट

ग्लेन मॅक्सवेल हा भारत-ऑस्ट्रेलिया वनडे इतिहासात सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला फलंदाज आहे. त्याने भारताविरुद्ध १३४ च्या स्फोटक स्ट्राइक रेटने धावा केल्या. विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंमध्ये त्याच्या आसपास कोणीही नाही. त्याच्यानंतर मिचेल मार्शचा नंबर लागतो ज्याने भारताविरुद्ध ११६ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०२ च्या स्ट्राईक रेटने धावा करणारा श्रेयस अय्यरही आहे.

मॅक्सवेलने भारताविरुद्धच्या 31 सामन्यांच्या 30 डावांमध्ये 941 धावा केल्या आहेत. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी ३४.८५ राहिली आहे. खालच्या फळीतील फलंदाजीमुळे त्याला भारताविरुद्ध आतापर्यंत शतक झळकावता आलेले नसले तरी त्याने 6 अर्धशतके नक्कीच झळकावली आहेत.


हेही वाचा: