IND vs AUS: तुफानी शतक ठोकत ग्लेन मॅक्सवेलने भारताच्या हातून हिसकावला विजय, सामन्यानंतर केले मोठे वक्तव्य; म्हणाला , हे तर…”

हेही वाचा: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी.. ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

 

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा 5 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या मालिकेत पहिला विजय नोंदवला. ग्लेन मॅक्सवेलने शानदार शतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 3 गडी गमावून 222 धावा केल्या.

या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम ऑस्ट्रेलियाने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. या सामन्यात भारताकडून ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावले, तर ग्लेन मॅक्सवेलने आपल्या संघासाठी विजयी शतक झळकावले. या शतकासह मॅक्सवेलने रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली.

IND vs AUS:ग्लेन मॅक्सवेलने रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा हा जगातील एकमेव खेळाडू होता ज्याच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार शतके झळकावण्याचा विक्रम होता, मात्र आता ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने रोहितच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मंगळवार, 28 नोव्हेंबर रोजी भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेतील तिस-या सामन्यात मॅक्सवेलने 48 चेंडूत 104 धावांची शानदार खेळी केली आणि आपल्या संघाला विजयाकडे नेले.  या खेळीमुळे मॅक्सवेलला सामनावीराचा किताब देण्यात आला.

IND vs AUS: विजयानंतर काय म्हणाला मॅक्सवेल?

आपल्या संघाला विजयाकडे नेल्यानंतर, मॅक्सवेल म्हणाला की हे सर्व फार लवकर घडले. आमच्या मनात एकही नंबर नव्हता. मला माहीत होते की आम्ही शेवटच्या षटकापर्यंत पोहोचू शकलो तर आम्ही खेळात असू.

IND vs AUS

IND vs AUS: पराभवानंतर काय म्हणाला कॅप्टन सूर्यकुमार यादव?

भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला,

“मॅक्सवेलला लवकर बाहेर काढण्याची आमची योजना होती. ऑस्ट्रेलिया नेहमीच खेळात होता.  गोलंदाजांनी मला सांगितले की, आम्ही त्याला (मॅक्सवेल) लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करू पण तसे झाले नाही. अक्षर हा अनुभवी गोलंदाज आहे, दव असताना अनुभवी गोलंदाजाला संधी नेहमीच असते, मग तो फिरकी गोलंदाज असला तरीही. मला माझ्या संघाचा खूप अभिमान आहे.”


हेही वाचा:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *