IND vs AUS Live: डेव्हिड वार्नरने रचला इतिहास, सचिन- एबीडिव्हीलीअर्स सह या 6 दिग्गज खेळाडूंचे मोडले विक्रम..
IND vs AUS Live: विश्वचषक 2023 चा पाचवा सामना भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियन संघ यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील कांगारू संघ प्रथमफलंदाजी करतोय. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावली. ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि बुमराहने त्याच्या दुसऱ्याच षटकात मिशेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर डेव्हिड वॉर्नर क्रीजवर आला आणि त्याने 41 धावांची खेळी खेळली. यादरम्यान वॉर्नरने एकदिवसीय विश्वचषकात आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या.आपल्या या खेळीत वार्नरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
IND vs AUS :एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला डेव्हिड वार्नर
या सामन्यात 41 धावाची खेळी खेळताच वार्नरने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. एकदिवशीय विश्वचषकात आता वार्नरच्या नावावर 1000 हून अधिक धावा झाल्या आहेत. एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा वॉर्नरने केवळ सचिनच नाही तर पाच महान खेळाडूंना मागे टाकले. त्यात व्हिव्हियन रिचर्ड्स, एबी डिव्हिलियर्स, सौरव गांगुली अशी अनेक नावं होती. आता तो डावाच्या बाबतीत या स्पर्धेत सर्वात जलद १००० धावांचा आकडा गाठणारा खेळाडू ठरला आहे. आपल्या 1000 धावा पूर्ण करण्यासाठी वार्नरने केवळ 19 डाव खेळले आहेत.
एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद 1000 धावा करणारे फलंदाज.
डेव्हिड वॉर्नर- 19 डाव
सचिन तेंडुलकर, एबी डिव्हिलियर्स – २० डाव
व्हिव्हियन रिचर्ड्स, सौरव गांगुली – २१ डाव
मार्क वॉ- 22 डाव
हर्शेल गिब्स- 22 डाव
या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 52 चेंडूत 41 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार मारले. कुलदीप यादवने त्याला आपला बळी बनवले आणि विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात कांगारू संघाला धक्का दिला. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्यांदा खेळायला आलेला ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत सापडला. भारतीय फिरकीपटूंनी कांगारूंच्या फलंदाजांना खूप त्रास दिला. रवींद्र जडेजाने बॅक टू बॅक तीन विकेट घेतल्या आणि कुलदीप यादव आणि अश्विनने कांगारू संघाला धावा करू दिल्या नाहीत.
PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..