IND vs AUS live: शुभमन गिलची जबरदस्त फलंदाजी, दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात शानदार शतक ठोकत केले ‘हे’ 3 विक्रम..
IND vs AUS live: इंदोरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने (Shubhman Gill) शानदार शतक झळकावले आहे. गिलने ९२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. याआधी गिलने मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली होती, जिथे त्याने 63 चेंडूत 74 धावा केल्या होत्या. मात्र, तेव्हा गिलचे शतक हुकले होते. पण आज त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले, जे त्याचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले शतक होते.
गिलने 35व्या एकदिवसीय सामन्याच्या 35व्या डावात आपले सहावे अंतरराष्ट्रीय शतक झळकावले. गिलने आतापर्यंत वनडेत १९०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. गिल एकदिवसीय सामन्यांच्या ३५ डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

या शतकासह गिलने यावर्षी वनडेत १२०० धावांचा आकडाही गाठला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गिलचे हे पहिले शतक आहे. याआधी त्याने नुकत्याच झालेल्या आशिया कप २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. गिलच्या सहा वनडे शतकांमध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे.
गिलची(Shubhman Gill) आंतरराष्ट्रीय कारकीर्द
गिल(Shubhman Gill) हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 18 कसोटी, 35 एकदिवसीय आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 33 डावांमध्ये त्याने 32.2 च्या सरासरीने 966 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतके आणि 4 अर्धशतके केली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 1900 धावांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय, T20 आंतरराष्ट्रीयमध्ये, गिलने 11 डावात 30.4 च्या सरासरीने आणि 146.86 च्या स्ट्राइक रेटने 304 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकांचा समावेश आहे. गिल हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारा फलंदाज आहे.
गिलच्या शतकाने टीम इंडिया मजबूत स्थितीत असून ए क चांगल्या धावसंखेकडे वाटचाल करत आहे.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..