IND vs AUS LIVE: ऑस्ट्रोलियाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात एक बदल, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IND vs AUS LIVE: ऑस्ट्रोलियाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात एक बदल, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IND vs AUS LIVE: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील T20 मालिकेतील 5 वा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघात 1-1 असा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी कायम ठेवली आहे.

अशा स्थितीत हा सामना जिंकून भारताला सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली मालिका 4-1 अशी खिशात घालायची आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे. कांगारू संघाने आजपर्यंत एकही सामना चिन्नास्वामीमध्ये गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियानेही येथे एका सामन्यात भारताचा पराभव केला आहे.

IND vs AUS

IND vs AUS LIVE: असे आहेत दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत: यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (प.), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग.

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (wk/c), बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.

IND vs AUS LIVE: खेळपट्टीवरून कोणाला मदत मिळते?

बंगळुरूची खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त ठरली आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हाय व्होल्टेज सामने पाहिले जातात. फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीवर भरपूर सपोर्ट असला तरी मैदानाचा आकार लहान असल्याने मोठे फटके सहज मारले जातात. अशा स्थितीत या सामन्यात गोलंदाजांना सावधपणे गोलंदाजी करावी लागणार आहे. हा सामना उच्च स्कोअरिंग होईल अशी अपेक्षा आहे.

IND vs AUS : अंतिम सामन्यासाठी टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल, तर चिन्नास्वामीचे वातावरणही राहणार ढगाळ, पहा दोन्ही संघांची प्लेईंग 11

IND vs AUS LIVE: T20 मध्ये दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलिया  (IND vs AUS) यांच्यात आतापर्यंत 30 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 18 आणि ऑस्ट्रेलियाने 11 विजय मिळवले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 7 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 4 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने पाठलाग करताना 10 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या नावावर 6 विजय आहेत. मायदेशात भारताने 14 टी-20 पैकी 9 जिंकले आहेत, तर 5 गमावले आहेत.

IND vs AUS: दीपक चहर नाही संघाचा हिस्सा..

सूर्यकुमार यादव यांनी नाणेफेकीच्या वेळी सांगितले की, दीपक चहर वैद्यकीय आणीबाणीमुळे घरी परतला आहे. त्याच्या जागी अर्दशिप सिंगचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघातही बदल करण्यात आला आहे. ख्रिस ग्रीनच्या जागी नॅथन एलिसला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली आहे.

IND vs AUS LIVE: ऑस्ट्रोलियाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात एक बदल, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IND vs AUS दौऱ्यासाठी असे आहेत दोन्ही संघ

भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, दीपक चहर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, इशान किशन, प्रसीद कृष्णा, वॉशिंग्टन सनडर. , शिवम दुबे, अर्शदीप सिंग, टिळक वर्मा.

ऑस्ट्रेलिया संघ: ट्रॅव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (कप्तान/कर्णधार), बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन, नॅथन एलिस.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *