IND vs AUS Probable playing11: हायव्होल्टेज अंतिम मुकाबल्यासाठी रोहित शर्मा संघात करणार मोठे बदल, अश्विनची इंट्री, तर सुर्यकुमार यादव होऊ शकतो बाहेर, पहा संभावित प्लेईंग 11

IND vs AUS  Probable playing 11: विश्वचषक 2023 चा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील अंतिम सामन्याची उत्सुकता वाढत आहे. आता या सामन्याला फक्त एक दिवस उरला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा शानदार सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.

फायनलची प्लेइंग इलेव्हन भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी डोकेदुखी ठरली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सर्व गोलंदाज सपाटून मार खात असतानाही टीम इंडियाला सहाव्या गोलंदाजाची उणीव भासत होती. मात्र केवळ 5 गोलंदाजी पर्याय असल्याने भारतीय संघाकडे कोणताही पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत फायनलमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

IND vs AUS FINAL: टीम इंडियाकडे 20 वर्षापूर्वीचा बदला घेण्याची संधी, ऑस्ट्रोलीयासोबत भिडणार अंतिम सामन्यात..!

IND vs AUS  Probable playing 11: रविचंद्र अश्विनची होऊ शकते संघात इंट्री?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी रविचंद्रन अश्विन प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये प्रवेश करू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. डावखुऱ्या फलंदाजांसाठी अश्विन नेहमीच जीवघेणा ठरला आहे. ऑस्ट्रेलियन संघात दोन डावखुरे फलंदाज आहेत, त्यामुळे अश्विनचे ​​अंतिम फेरीत पुनरागमन होण्याची शक्यता आहे. अश्विनने संघात प्रवेश केला तर कोणाला तरी संघातून बाहेर बसावे लागू शकते.. अश्विनच्या पुनरागमनानंतर प्लेइंग इलेव्हनमधून कोणाला वगळले जाऊ शकते? हे उद्याच कळेल.

IND vs AUS  Probable playing 11: सुर्यकुमार यादव वर ही संघातून बाहेर होण्याचे संकट .

सहावा गोलंदाज म्हणून रविचंद्रन अश्विनचे ​​पुनरागमन झाले तर स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवचे संघातून बाहेर पडणे निश्चित मानले जात आहे. या विश्वचषकात सूर्याला आतापर्यंत आपल्या बॅटने काही खास दाखवता आलेले नाही, त्यामुळे सूर्या अंतिम फेरीतून बाहेर पडू शकतो.

अश्विन हा अष्टपैलू खेळाडू आहे, त्यामुळे तो बॅटनेही धावा करू शकतो. दुसरीकडे, जर भारतीय संघाने केवळ 5 गोलंदाज मैदानात उतरवले आणि अश्विनने पुनरागमन केले तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संघातून काढून टाकले जाऊ शकते. सिराजला न्यूझीलंडविरुद्धही खूप मार खावा लागला होता.

IND vs AUS  Probable playing 11: हायव्होल्टेज अंतिम मुकाबल्यासाठी रोहित शर्मा संघात करणार मोठे बदल, अश्विनची इंट्री, तर सुर्यकुमार यादव होऊ शकतो बाहेर, पहा संभावित प्लेईंग 11

बुमराह आणि शमी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वगळता येणार नाही. उपांत्य फेरीत कुलदीप यादव खूपच किफायतशीर ठरला. त्याचवेळी जडेजाला बाहेर ठेवणे अकल्पनीय आहे, यावरून अश्विनच्या पुनरागमनावर सिराज किंवा सूर्या यांपैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते, हे नक्की .

World Cup 2023: IND vs AUS अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग 11

रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *