VIRAL VIDEO: रवींद्र जडेजाने ठोकला एवढा जबरदस्त षटकार की, स्वतः विराट कोहलीदेखील झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना सध्या अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जात आहे. तिसर्या दिवशी शुभमन गिलच्या शानदार शतकानंतर विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार पुनरागमन केले. भारतीय संघही आता मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. रवींद्र जडेजानेही विराट कोहलीला चांगली साथ दिली.
शुभमन गिल बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा फलंदाजीला आला, पण विराट कोहलीसोबत तो अत्यंत सावधपणे फलंदाजी करत होता. खेळत असताना मॅथ्यू कुहनेमनच्या एका चेंडूवर शानदार षटकार मारला जो पाहून दुसर्या एंड वरील विराट कोहलीसुद्धा हैराण झाला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

तिसऱ्या दिवसाखेर रवींद्र जडेजा १६ धावांवर नाबाद
रवींद्र जडेजाने विराट कोहलीला सहाव्या विकेटसाठी चांगली साथ दिली. विराट आणि जडेजा यांच्यातील ५० धावांची अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली आहे. सध्या विराट कोहली 59 आणि रवींद्र जडेजा 16 धावांवर नाबाद आहे. अशा स्थितीत उद्या या दोघांकडून मोठी धावसंख्या अपेक्षित आहे.
येथे पहा जडेजाचा षटकार..
असे आहेत दोन्ही संघ:
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (सी), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (डब्ल्यूके), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ (सी), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (डब्ल्यूके), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन
हे ही वाचा..
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…