IND vs AUS LIVE: स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात झाले 2 मोठे बदल.. असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर हा सामना आयोजित केला जाईल. या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. इशान किशनच्या जागी रोहित शर्माला, तर शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे.
असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (w), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
View this post on Instagram
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, सीन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने कर्णधारपद भूषवले होते. हार्दिकने आपल्या वनडे कर्णधारपदाची सुरुवात विजयाने केली. मुंबईत, कांगारू संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 188 धावांवर आटोपला, याला प्रत्युत्तर म्हणून केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी भागीदारी करून सामना जिंकला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये आतापर्यंत 144 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 54 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 80 सामने जिंकले आहेत. 10 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 65 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने ३० तर ऑस्ट्रेलियाने ३० सामने जिंकले आहेत. यादरम्यान 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ
टीम इंडिया – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया संघ – स्टीव्ह स्मिथ (कर्णधार) शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा

IND vs AUS 2रा ODI लाइव्ह स्ट्रीमिंग: टीव्हीवर लाइव्ह कसे पाहायचे ?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी एकदिवसीय मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल.
IND vs AUS 2रा ODI लाइव्ह स्ट्रीमिंग: मोबाइलवर लाइव्ह कसे पाहायचे?
डिस्ने प्लस हॉटस्टारवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी एकदिवसीय मालिका तुम्ही मोबाईलवर पाहू शकता.
हेही वाचा:
2023 चा वर्ल्डकप जिंकून मी निवृत्ती घेणार- इंग्लंडच्या या स्टार खेळाडूने केला मोठा खुलासा..
ऐन वर्ल्डकप मध्ये रिषभ पंत बनला संगीतकार, क्रिकेट सोडून आता करतोय ही कामे..
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..