IND vs AUS: पहिला एकदिवशीय सामना आज खेळवला जाणार, के एल राहुलएला हार्दिक देईल का संधी? असा असू शकतो अंतिम 11 खेळाडूंचा भारतीय संघ..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरू होईल. मोबाईल आणि टीव्हीवर तुम्ही घरबसल्या सामना सहज पाहू शकता.
कौटुंबिक कारणांमुळे टिम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात उपलब्ध नसला तरी या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. हार्दिक पांड्या पहिल्या सामन्यात संघाची धुरा सांभाळणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडूनही त्यांचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स या मालिकेतून बाहेर पडला असून स्टीव्ह स्मिथ जबाबदारी सांभाळणार आहे.

IND vs AUS ODI मध्ये हेड टू हेड: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोण बलाढ्य आहे?
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये आतापर्यंत 143 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने यातील 53 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 80 सामने जिंकले आहेत. 10 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 64 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 29 आणि ऑस्ट्रेलियाने 30 सामने जिंकले आहेत. यादरम्यान 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ
टीम इंडिया – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया संघ – स्टीव्ह स्मिथ (कर्णधार) शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा
IND vs AUS 1ली ODI लाइव्ह स्ट्रीमिंग: टीव्हीवर लाइव्ह कसे पहायचे?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी एकदिवसीय मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल.
IND vs AUS 1ली ODI लाइव्ह स्ट्रीमिंग: मोबाइलवर लाइव्ह कसे पाहायचे ?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी एकदिवसीय मालिका तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर मोबाईलवर पाहू शकता.
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…