भारत -बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीत झाले मोठे बदल,आता या ठिकाणी पहा सामना… वेळ आणि तारीख? घ्या जाणून सविस्तर..
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना उद्यापासून म्हणजेच 22 डिसेंबरपासून ढाका येथे खेळवली जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मोठ्या धावसंखेने विजय मिळवून आपला हौसला बुलंद केला आहे.
जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या नजरेतून पाहायचं म्हटल तर भारतासाठी हा सामना जिंकणे अतिशय आवश्यक आहे. दुसऱ्या कसोटीसह मालिका ही जिंकून जागतिक कसोटी मालिकेसाठी फायनल खेळण्याच्या दृष्टीने भारत आणखी एक पाऊल पुढे टाकेल.
View this post on Instagram
नियमित कर्णधार रोहित शर्मा अद्याप अंगठ्याच्या दुखापतीतून सावरला नसल्याने भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल अपेक्षित नाहीत. पहिल्या कसोटीत शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांच्यासाठी सुवर्णसंधी होती आणि त्यांनी ती चांगली हेरून जबरदस्त कामगिरी करत संघाच्या विजयात मोठी कामगिरी निभावली.
भारत आणी बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी? कुठे? आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या या लेखात सविस्तर..
बांगलादेश विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना कुठे खेळला जाईल?
बांगलादेश विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम, मीरपूर,ढाका येथे खेळवला जाईल.
बांगलादेश विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?
बांगलादेश विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना बुधवार, 22 ते 26 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल.

बांगलादेश विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना किती वाजता सुरू होईल?
बांगलादेश विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होईल. नाणेफेक IST सकाळी 8:30 वाजता होईल.
कोणते टीव्ही चॅनेल बांगलादेश विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना प्रसारित करतील?
बांगलादेश विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
बांगलादेश विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पहायचे?
बांगलादेश विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना SonyLIV अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
असे असतील दोन्ही संघाचे खेळाडू:
बांगलादेश : महमुदुल हसन जॉय, नजमुल हुसेन शांतो, मोमिनुल हक, यासिर अली, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन (क), लिटन दास, नुरुल हसन, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, खालेद अहमद, झाकीर हसन, रेजाउर रहमान राजा.
भारतीय संघ: KL राहुल (C), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (VC), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (WK), KS भरत (WK), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.