IND vs BAN 2nd Test: टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध खेळली गेलेली 2 कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. कानपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजी करत बांगला टायगर्सचा पराभव केला. या सामन्यात भारताने अनेक विक्रम केले. चला एक नजर टाकूया या विक्रमावर..!
IND vs BAN 2nd Test: दुसऱ्या कसोटीमध्ये झाले हे मोठे विक्रम.
1.) कमीत कमी षटके फलंदाजी करून कसोटी जिंकणारा भारत ठरला जगातील दुसरा संघ.
बांगलादेश विरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताने विशेष कामगिरी केली. भारतीय संघाने इंग्लंडला मागे टाकले असून कमीत कमी षटके फलंदाजी करून कसोटी जिंकणारा जगातील दुसरा संघ बनला आहे.
भारताने बांगलादेशविरुद्ध शानदार कामगिरी करत अवघ्या ३ दिवसांच्या खेळात सामना जिंकून इतिहास रचला. कसोटी सामन्यात सर्वात कमी षटके टाकून सामना जिंकणारा भारत आता जगातील दुसरा संघ बनला आहे.
भारताने या सामन्यात 52 षटकांची फलंदाजी केली आणि सामना 8 विकेटने जिंकला. सर्वात कमी षटके फलंदाजी करून सामना जिंकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. आफ्रिकेने 46.5 षटकांत फलंदाजी करत सामना जिंकला. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड आहे, ज्याने ६१ षटकांची फलंदाजी करून सामना जिंकला.
चौथ्या क्रमांकावर बांगलादेश आहे, ज्याने 89.4 षटकांत सामना जिंकला. तर ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे, ज्याने 101.4 षटकात सामना जिंकला.
भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 233 धावा केल्या होत्या, याला प्रत्युत्तर म्हणून भारताने स्फोटक फलंदाजी करत 34.4 षटकात 285/9 धावा करत डाव घोषित केला. दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव 146 धावांवर आटोपला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १७.२ षटकांत ९८/३ धावा करून सामना जिंकला. आता भारतीय संघ कसोटीत सर्वात कमी षटके खेळून सामना जिंकणारा जगातील दुसरा संघ बनला आहे.
हे पण वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..