Asia Cup 2023: सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी ते बुमराह- कुलदीपची कमी… बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाची 5 मोठी कारणे..

Asia Cup 2023: सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी ते बुमराह- कुलदीपची कमी… बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाची 5 मोठी कारणे..


Asia Cup 2023 : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या गेलेल्या आशिया कप 2023 च्या सुपर 4 सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. सामना खूपच रोमांचक झाला आणि शेवटपर्यंत दोन्ही संघांमध्ये निकराची लढत पाहायला मिळाली. मात्र, विजयाचे श्रेय बांगलादेशलाच गेले. या सामन्यात भारताच्या पराभवाची अनेक कारणे होती, जी संघाला लक्षात ठेवावी लागतील.

१.टीम इंडियाला जाणवली बूमराह कुलदीपची कमी.

भारतीय संघाने या सामन्यात अनेक बदल केले होते आणि अनुभवी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना विश्रांती दिली होती. मात्र, या दोघांशिवाय संघाची गोलंदाजी ढिली दिसत होती. भारताने सुरुवातीला 3 विकेट्स घेतल्या पण शकिब अल हसन मैदानावर सेटल होताच त्याच्यावर एकही गोलंदाज थांबवू शकला नाही. संघाला मधल्या षटकांमध्ये अनुभवी आणि योग्य फिरकी गोलंदाजाची कमतरता होती.

Asia Cup 2023
Asia Cup 2023 ind vs ban

2. रोहितच्या तुलनेत शाकिबचे कर्णधारपणा आक्रमक.

या सामन्यात बांगलादेशच्या विजयामागे एक प्रमुख कारण म्हणजे शकिब अल हसनची कर्णधारपदाची धुरा खूप उत्कृष्ट होती. शाकिब सुरुवातीपासूनच अटॅकिंग मोडमध्ये होता. त्याच्या फिरकीपटूंनाही चमकदार खेळ करून भारतावर दडपण आणले. दुसरीकडे, शाकिब अल हसन आणि हरिदोई आश्चर्यकारक कामगिरी करत असताना रोहित बचावात्मक रणनीती अवलंबत होता. अशा परिस्थितीत शाकिबने कर्णधारपदाच्या बाबतीत रोहितला मागे टाकले.

3. सूर्यकुमार यादव पुन्हा ठरला अपयशी.

टी-20 चा नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) वनडेत सतत अपयशी होताना दिसत आहे. त्यांनी अद्याप कोड क्रॅक केलेला नाही असे दिसते. बांगलादेशविरुद्धही त्याची तीच अवस्था झाली होती. सूर्याला केवळ 26 धावा करता आल्या आणि तो खूप संघर्ष करताना दिसला. तो फक्त फिरकीपटूंविरुद्ध रिव्हर्स स्वीप खेळत होता आणि शेवटी तो खेळून बाद झाला.

4. जडेजा-शार्दुलनेही केले नाराज.

भारतीय संघाचे दोन अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि शार्दुल ठाकूर  (Shardul Thakur)यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली असली तरी संपूर्ण स्पर्धेत दोघेही फलंदाजीत अपयशी ठरले आहेत. बांगलादेशविरुद्धही जडेजा केवळ 7 धावा करू शकला, तर शार्दुल केवळ 11 धावा करू शकला आणि कठीण काळात  संघासाठी काहींही विशेष असी कामगिरी करू शकले नाहीत.

Asia Cup 2023

ज्या सामन्यात भारताविरुद्ध सर्व काही गेले. तर शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांच्या खेळीने सर्वांची मने जिंकली. गिलने शानदार शतक झळकावले तर अक्षर पटेलने शेवटपर्यंत झुंज देत 42 धावा केल्या, तरीही तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि 49व्या षटकात तो बाद झाला आणि त्याच्यासोबतच टीम इंडियाच्या विजयाच्या आशाही संपल्या..

आता आशिया कपचा अंतिम सामना उद्या (17 सप्टेबर) ला श्रीलंका आणि भारत (IND VS SL) यांच्यात कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो आशिया कप 2023 चा विजेता ठरणार आहे. त्यामुळे चाहते या सामण्यासाठी खूप उत्सुक आहेत.


हेही वाचा:

टीम इंडियाचे ‘हे’ 3 क्रिकेटर नेहमीच व्हेज जेवणापेक्षा नॉनव्हेज जास्त खातात , एकाने तर स्वतः मीडियासमोर केलंय मान्य …

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *